आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: राणीने असे स्वच्छ केले राजाचे पाय, अशा पूर्ण केल्या राजघराण्याच्या परंपरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- राजस्थानच्या डुंगरपुरची राजकुमारी तृषिका सिंह हिला लग्नानंतर अनेक दाक्षिणात्य परंपरा पार पाडाव्या लागत आहेत. तिच्यासाठी या पूर्णपणे नवीन आहेत. म्हैसूरचे राजा यदुवीर वाडियार यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांमध्ये तृषिका रमली आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि सोन्याने मढवलेल्या म्हैसूर पॅलेजमध्ये राहत असलेल्या तृषिकाला अनेक परंपरा पार पाडाव्या लागत आहेत... विशेष म्हणजे या राजघराण्याच्या परंपरा फारच रंजक आहेत... आज आम्ही त्यांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय...
फोटोग्राफ्समध्ये असे सांगत आहेत स्वतः राजे
- दाक्षिणात्य परंपरांप्रमाणे तृषिकाचे लग्न झाले होते. तिला उत्तरेकडील परंपरांची सवय होती. पण आता ती सासरी रुळली आहे. येथील वेगवेगळ्या परंपरा तिला अवगत झाल्या आहेत.
- म्हैसूर राजघराण्याच्या लग्नाला देशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या लग्नाची देश-विदेशात चर्चा झाली होती. लग्नातही तृषिकाला अनेक रिती-रिवाज पार पाडावे लागले होते.
- तृषिकाला एखादी पद्धत माहिती नसेल तर यदुवीर स्वतः तिला गाईड करतात. माहिती देतात. त्याचे महत्त्व समजावून सांगतात.
अशा असतात राजघराण्याच्या परंपरा
- म्हैसूरच्या राजघराण्यात विवाहानंतरही अनेक परंपरा पार पाडाव्या लागतात. कुळाचारानुसार आपले वागणे ठेवावे लागते.
- दसरा आणि दिवाळीला वेगवेगळ्या पूजा-महापूजा आयोजित केल्या जातात. त्यासाठी वेगवेगळे नियम असतात.
- राणी म्हणून या राजघराण्यात वेगळा मान असला तरी परंपरा पार पाडण्यातून सूट नसते. विशेष म्हणजे महाराणीचे याकडे विशेष लक्ष असते.
- दसऱ्याला हत्ती-घोडे आणि मोठ्या लवाजम्यासह राजा शहरात मिरवणूक काढतो. तेव्हा शहरातील लोक त्याला मान देतात.
- लग्न झाल्यानंतरही अशीच मिरवणूक काढली जाते. यावेळी हजारो लोक या मिरवणुकीत सहभागी होतात.
- मिरवणूक काढण्यापूर्वी राणी राज्याचे तिलक करते. पाय स्वच्छ करते. आदी परंपरा पार पाडाव्या लागतात.
- राजाला वस्त्र धारण करुन देण्यासह मुकूट घालण्याचे कामही राणीलाच करावे लागते. तसेच राजाला विदाई देण्याचीही एक खास पद्धत असते.
पुढील स्लाईडवर फोटोंमध्ये बघा, अशा आहेत म्हैसूरच्या श्रीमंत यदुवीर राजघराण्याच्या परंपरा....
बातम्या आणखी आहेत...