आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये कैद्यांना घेऊन जाणारी व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 पोलिसांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीतामढी- बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात काल (शुक्रवारी) रात्री कैद्यांना घेवून जाणारी व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 7 पोलिस आणि एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात 8 पोलिस आणि एक कैदी जखमी झाला आहे. जखमींवर मुझफ्फरपुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
 
3 पोलिसांचा हॉस्पिटलमध्ये झाला मृत्यू...
- रून्नीसैदपूर ठाण्याच्या हद्दीतील गैघट गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
- सीतामढी येथून हेमंत दास आीण सुहाग पासवान या दोन कैद्यांना भागलपूर कोर्टात सुनावणीसाठी नेले जात असतानाच ही दुर्घटना घडली. पोलिस व्हॅनमध्ये 17 पोलिस होते.
- ट्रकने व्हॅनला समोरून जोरदार धडक दिली. एक कैदी आणि चार पोलिसांचा जागेवरच मृत्यू झाला तर 3 पोलिसांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि पोलिसांत बाचाबाची...
- अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिसांना मुझफ्फरपुर येथील श्री कृष्ण मेमोरियल कॉलेज अॅण्‍ड हॉस्पिटलमध्ये (SKMCH) दाखल करण्‍यात आले आहे.
- हॉस्पिटलमध्ये ज्यूनिअर डॉक्टर्स आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी पोलिसांवर उपचार करताना विलंब होत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याच मुळे 3 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...