आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पृथ्वी-2’ ची दोनदा यशस्वीरीत्या चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालासोर - भारताने मंगळवारी देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र चाचणीत पुढचा टप्पा गाठला. पृथ्वी-2 क्षेपणास्त्राचे दोन दिवसांत दोन वेळा परीक्षण घेण्यात आले. ओडिशातील चांदीपूरजवळ ही झालेली ही चाचणी यशस्वी ठरली.
जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची क्षमता आहे. चाचणीत क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अपेक्षेप्रमाणे गाठले, असे आयटीआरचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी सांगितले.

2003 मध्ये डीआरडीओने पृथ्वी क्षेपणास्त्राची निर्मिती केली होती. पृथ्वी-2 ची चाचणी हा नियमित प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग आहे. भारताची शस्त्र सज्जता या चाचणीतून स्पष्ट होते. पृथ्वी क्षेपणास्त्रातून 500 किलो ग्रॅम ते 1000 किलो ग्रॅमचे विशिष्ट इंधन वापरले जाते. त्यात दोन इंजिन आहेत. त्याचबरोबर हवेत मार्ग बदलण्याची अंतर्गत व्यवस्था देखील त्यात समाविष्ट आहे.