आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची ओडिशात यशस्वी चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालासोर (ओडिशा) - संरक्षण सज्जतेत आणखी भर घालत भारताने पृथ्वी-2 या अण्वस्त्रवाहू स्वदेशी क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी घेतली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या पृथ्वी-2चा पल्ला 350 किलोमीटर असून, 500 ते 1000 किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे. अचूक निशाण्यासाठी त्यात आधुनिक मार्गदर्शक प्रणाली आहे. चांदीपूरमधील एकीकृत चाचणी रेंजमध्ये सकाळी 9:15 वाजता क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. या यशाबद्दल संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी पृथ्वी-2ची निर्मिती करणार्‍या चमूचे अभिनंदन केले आहे.

डीआरडीओने विकसित केलेले पृथ्वी- 2 क्षेपणास्त्र आधीच भारतीय लष्कराच्या भात्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे. सोमवारी भारतीय लष्कराच्या नियमित प्रशिक्षण सरावांतर्गत त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.

19 ऑगस्टला झेपावणार जीएसलव्ही-डी 5 : स्वदेशी क्रायोजेनिक अपर स्टेजयुक्त भारताचा जीएसएलव्ही-डी 5 उपग्रह जीसॅट-14 या संदेशवहन सॅटेलाइटला घेऊन 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4:50 वाजता झेपावणार आहे. र्शीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून त्याचे प्रक्षेपण केले जाईल.