आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 कोटी रूपयांच्‍या विमानात अंबानी करतात प्रवास, जाणून घ्‍या उद्योजकांच्‍या जेट विषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश अंबानी यांच्या विमानाला आग लागल्‍याची चर्चा देशभर सुरू झाली. मात्र अंबानींचे खासगी विमान ' एअरबस 319' सुखरूप असल्‍याची माहिती मिळाल्‍यांनतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. या निमित्तान आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील 6 प्रसिद्ध उद्योगपती कोणती जेट विमान वापरतात आणि त्‍याची आजची किंमत काय आहे याविषयी माहिती देणार आहोत.
242 कोटी रूपयाचे विमान पत्‍नीला भेट-
आग लागल्‍याची आफवा पसरल्‍यानंतर मुकेश अंबानी यांच्‍या ' एअरबस 319' या विमानाची टेस्‍टिंग करण्‍यात आली.मात्र सर्व काही सुरळीत असल्‍याचे सांगण्‍यात आले. या विमानाची किंमत 242 कोटी रूपये आहे. 2007 मध्‍ये पत्‍नीच्‍या वाढदिवसाला अंबानी यांनी हे विमान नीता अंबानी यांना गिफ्ट केले. देशातील खाजगी विमानापैकी सर्वात महागडे विमान असल्‍याची चर्चा झाली.

400 कोटी रूपयांचे अंबानीचे विमान-
रिलायन्‍सचे संचालक मुकेश अंबानी यांचे विमान म्‍हणजे एखाद्या उडत्‍या महालासारखे आहे. बोयींग कंपनीचे बिझनेस जेट- 2 या नावाने या विमानाला ओळखले जाते. 1004 स्‍कोयर फीट क्षेत्रफळ असलेले अंबानीचे विमान म्‍हणजे फाइव्‍ह स्‍टार हॉटेलसारखे आहे. या विमानात बोर्ड रूम, प्रायव्‍हेट बेडरूमची सोय करण्‍यात आली आहे. अंबानी यांच्‍याकडे बिझनेस जेट-2, ' एअरबस 319' याशिवाय फॉलकन 900 ईएक्‍स नावाचे वेगळे जेट आहे. जगातील श्रीमंत व्‍यक्तिंच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यांच्‍यासाठी स्‍पेशल जेट तयार करण्‍यात येत असल्‍याची माहिती समोर आली आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या कोणत्‍या उद्योजकाकाडे आहे कोणते विमान...