आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकाच्या डान्सने स्टेजवर लावली आग, पाहाणारे पाहातच राहिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भठिंडा - येथे शनिवारी चौथ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धांचे उदघाटन झाले. यावेळी झालेल्या रंगारंग कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने रघुपती राघव राजाराम गीतावर ताल धरला. याआधी मंचावर येताना प्रियंकाने जोरदार आवाजात 'सत श्री अकाल भठिंडा, सीएम साहिब, डिप्टी सीएम साहिब.'
त्यानंतर प्रियंका म्हणाली, मी देखील पंजाबची बेटी आहे. अम्बालाची आहे. मी आज स्वतःला अतिशय भाग्यशाली समजते जी आज मी येथे आहे. मी देखील चांगली कबड्डी खेळते. या कबड्डी विश्वचषकाच्या उदघाटनासाठी मला उपस्थित राहाण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कबड्डी अशीच वाढत राहो आणि पंजाबचे नाव जगात प्रसिद्ध व्हावे या शुभेच्छा.
चौथ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे उदघाटन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन शानदार झाले. या सोहळ्यात प्रियंकाने परफॉर्म केले. या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले आहेत. यातील पुरुष गटात 12 संघ आणि महिला गटात 8 संघ सहभागी झाले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उदघाटन सोहळ्याचा रंगारंग कार्यक्रम