आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Denies Link Between Her Property Purchases And Vadra Finances, Says Allegations Politically Motivated

हरियाणा जमीन खरेदी प्रकरण कायदेशीरच, पतीचा व्यवहाराशी काहीही संबंध नाही- प्रियांका गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- हरियाणा येथील जमीन खरेदीमध्‍ये पती रॉबर्ट वडेरा तसेच त्‍यांच्‍या कोणत्‍याही कंपनीचा संबंध नसल्‍याचे स्‍पष्टीकरण प्रियांका गांधी यांनी दिले आहे. प्रियांका गांधी यांनी काही वर्षापूर्वी हरियाणामध्‍ये जमीन खरेदी केली होती. मात्र, हा व्‍यवहार डीएलएफ कंपनीच्या पैशातून झाला असल्याची शक्यता एका वृत्तपत्राने वर्तविली होती.
 
डीएलएफ आणि रॉबर्ट वडेरा यांची स्‍कायलार्इट हॉस्पिटॅलिटी ही कंपनी वादग्रस्‍त जमीन खरेदी प्रकरणी सध्‍या हरियाणा सरकारच्‍या रडारवर आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रियांका गांधी यांनी हे स्‍पष्टीकरण दिले आहे. 
 
काय आहे प्रकरण? 
- काही वर्षांपूर्वी प्रियांका गांधी यांनी हरियाणातील फरिदाबादमध्‍ये अमिपूर गावात पाच एकर जमीन खरेदी केली होती. 
- रॉबर्ट वडेरा यांची स्‍कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनी वादात सापडण्‍यापूर्वी प्रियांका यांनी या जमिनीची खरेदी केली होती. 
- हा संपूर्ण व्‍यवहार चेकद्वारे करण्‍यात आल्‍याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले आहे.
- 15 लाखांत प्रियांका यांनी या जमिनीची खरेदी केली होती.  
- मात्र, हा व्‍यवहार प्रियांका यांनी डीएलएफ कंपनीने अवैधरित्‍या  कमावलेल्‍या पैशाद्वारे केला, असा आरोप त्‍यांच्‍यावर करण्‍यात येत आहे.

आजीकडून मिळालेल्‍या संपत्‍तीमधून खरेदी केली जमीन 
- आजी इंदिरा गांधी यांच्‍याकडून वारसाहक्‍काने मिळालेल्या मालमत्‍तेवर मिळणाऱ्या भाड्यातून आपण ही जमीन खरेदी केली, असे प्रियांका गांधी यांनी सांगितले आहे. 
- आपल्‍याकडील संपत्‍तीचा आणि रॉबर्ट वडेरा किंवा त्‍यांच्‍या कोणत्‍याही कंपनीचा काहीही संबंध नसल्‍याचे प्रियांका यांनी सांगितले आहे.   
- केवळ आपल्‍याला बदनाम करण्‍यासाठी आपल्‍यावर असे निराधार आरोप करण्‍यात येत आहे, असेही प्रियांका गांधी यांनी म्‍हटले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...