आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi Organise 6 Months Nishedh Andolan UP

प्रियंका गांधींची यूपीमध्ये ६ महिन्यांची निषेध योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली - केंद्रातील भाजप सरकार आणि उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारविरोधात सहा महिन्यांपर्यंत निषेध आंदोलने करण्याची रणनीती प्रियंका गांधी यांनी आखली असून कार्यकर्त्यांना त्याबाबतची सूचना दिली आहे. आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात प्रियंका गांधी दोन दिवसांच्या दौ-यासाठी आल्या असताना त्यांनी याची माहिती दिली.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर जनतेला होत असलेल्या त्रासाचा पाढा वाचला. त्या वेळी त्यांनी पुढील सहा महिन्यांत मोदी सरकार आणि अखिलेश यादव सरकारविरोधात निदर्शने करण्यासाठीची योजना कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे, ऊर्जा आणि पाणी टंचाईबाबत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत राज्यातील तहसील कार्यालयांसमोर आंदोलने करावीत.

मार्च महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करावीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील कार्यकर्त्यांनी आगामी पंचायतीच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.