लखनऊ/ अमेठी - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधी - वढेरा यांनी स्वतःची सुरक्षा भेदत एकटीनेच प्रवास केला. घरा-घरात जाऊन प्रचार करण्यावर त्या भर देत आहेत. प्रचाराला निघण्यापूर्वी प्रियंका यांनी एसपीजीच्या सर्व गाड्यांच्या चाव्या काढून घेतल्या, ज्यामुळे एसपीजी कमांडो त्यांच्यासोबत येऊ शकले नाही. बराच वेळ त्यांना प्रियंका यांचे लोकशन देखील मिळाले नाही. त्यामुळे एसपीजी अधिका-यांची भंबेरी उडाली.
प्राप्त माहितीनुसार, अमेठी मधील मुंशीगंज गेस्ट हाऊस येथून प्रियंका निवडणूक प्रचारासाठी निघाल्या. गौरीगंज येथे काही लोकांनी त्यांना थांबण्याची विनंती केली मात्र, एसपीजी कमांडोनी थांबण्यास नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या प्रियंका गांधी यांनी गांधीनगर मध्ये थांबून सर्व गाड्यांच्या चाव्या काढून घेतल्या आणि त्यांच्या गाडीचा चालक चंद्रकांत याला देखील उतरवून दिले. त्यानंतर त्यांनी त्यांची फोर्च्यूनर कार 120-130 च्या वेगाने चालवली.
अधिका-यांनी बराचवेळ पाठलाग केला, मात्र नाही पकडू शकले...
सीईओ सुमीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रियंका यांच्या गाडीचा दूरपर्यंत पाठलाग केला. मात्र, त्यांना थांबवण्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी एसएसपींना सुचना दिली. प्रिंयका नेमक्या कुठे गेल्या याची माहिती न मिळाल्यामुळे अधिका-यांची भंबेरी उडाली. राज्याच्या सुरक्षा यंत्रणेला याची माहिती देण्यात आली आणि सतर्कतेचे आदेश दिले गेले. त्यानंतर प्रियंका या संकरगंज येथे असल्याची माहिती मिळाली. तेथेच एसपीजी अधिका-यांनी त्यांना थांबवले. त्याआधी कासिमपूर आणि शाहमऊ येथे त्यांच्या प्रचारसभा होत्या मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे त्या रद्द करण्यात आल्या होत्या.
पुढील स्लाइडमध्ये, प्रचारसभेत काय म्हणाल्या प्रियंका