आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi Vadra Asks HP Govt Not To Divulge Her Property Details

जमिनीबाबत माहिती उघड केल्यास, जिवितास धोका होऊ शकतो : प्रियंका गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - आपल्या संपत्तीबाबत कोणतीही माहिती उघड करू नये, अशी विनंती प्रियंका गांधी वढेरा यांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे आहे. संपत्तीबाबत माहिती उघड झाल्यास जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रियंका यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात माहिती अधिकारांतर्गत काही माहिती मागवण्यात आली होती. त्याला उत्तर देताना प्रियंका यांनी हे पत्र लिहिले आहे. पण प्रियंका यांना एसपीजी सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत अशी माहिती देणे शक्य नसल्याचे शिमला येथील उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते देबाशिष भट्टाचार्य यांनी माहिती अधिकारांतर्गत प्रियंका गांधी यांच्या नावे असलेली जमीनीच्या तपशीलाची विचारणा केली होती. तसेच या प्रकरणी असलेल्या नोंदींची प्रतही मागितली होती. त्यात विक्री करारपत्र, त्याच्या विक्रीच्या परवानगी बाबतची माहिती असा तपशील मागवण्यात आला होता. या अर्जावर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 21 जुलै 2014 रोडी शिमला ग्रामीणच्या तहसीलदारांना माहिती देण्याचे आदेश दिले. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा त्यांची भूमिका बदलली. त्यांनी ही माहिती पुरवण्यासाठी परवानगी मागितली. विशेष म्हणजे तीस पानांची ही माहिती पुरवण्यासाठी तहसीलदाराने भट्टाचार्य यांच्याकडून शुल्कही घेतले.

त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे ही माहिती देणे शक्य नसल्याचे भट्टाचार्य यांना सांगण्यात आले. त्यानंतर भट्टाचार्य यांनी पुन्हा एकदा आपल्याला दिलेले कारण समाधानकारक नसल्याचे सांगत अर्ज दाखल केला. पण तोही फेटाळण्यात आला. त्यानंतरही या प्रकरणात आतापर्यंत टाळाटाळच करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपने या प्रकरणावरून हिमाचल सरकारवर हल्ला चढवला आहे.