शिमला - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका वढेरा यांचे शिमल्यातील 'समर हाऊस' पुन्हा एकदा वादात सापडले आहे. शिमला येथील भाजप आमदार सुरेश भारद्वाज यांनी या बंगल्याची तक्रार थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. भारद्वाज यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की प्रियंका यांच्या घराजवळच राष्ट्रपतींचे गेस्ट हाऊस 'प्रेसिडेंट रिट्रिट' आहे. सुरक्षेच्या कारणामुळे या घराच्या बांधकामाला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी. 2008 पासून या घराच्या बांधकामाला सुरुवात झाली असून आता ते पूर्णत्वाच्या दिशेने आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रियंका गांधी यांचे समर हाऊस...