आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा कोटींचा बंगला नाही भावला, प्रियंकांनी चक्क तो पाडायला लावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छराबडा(सिमला) - सिमल्यापासून जवळपास १२ किमी अंतरावर छराबडामध्ये बांधला जाणारा प्रियंका गांधी यांचा बंगला एखाद्या ड्रीम प्रोजेक्टपेक्षा कमी नव्हता. सहा वर्षांत बंगल्याची उभारणी झाली खरी,मात्र प्रियंका याना तो आवडला नाही. त्याची पाडापाडी करून तो नव्याने बांधण्यात येत आहे.
या बांधकामावर साधारण सव्वा कोटी रुपये खर्च झाले होते. प्रियंका यांना बंगल्याचे डिझाइन आवडले नव्हते. सपाट छताऐवजी ते पहाडी शैलीतून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. यामुळे बांधकाम पाडून खालिस पहाडी शैली बंगला बांधकामचे काम २०११ मध्ये सुरू झाले. बांधकाम हिमाचलमधील बांधकाम कंपनीला देण्यात आले. यानंतर प्रियंका यांनी बांधकामावर लक्ष दिल्याचे दिसले. दरवर्षी ४ ते ६ मेपर्यंत त्या इथे सोनिया गांधींसोबत राहिल्या. ५ जून रोजी आर्किटेक्टसोबत साइटवर येऊन कामाची पाहणी केली.
देवदारच्या वनात आकाराला येणाऱ्या बंगल्यावर प्रियंका यांनी मनापासून लक्ष घातले आहे. या घराची जागा शेतजमिनीसारखी आहे. या शेतात काही फळझाडे होती. जागा खरेदीनंतर त्यांनी या ठिकाणी भेट दिली तेव्हा तिथे नाशपातीचे छोटे रोपटे दिसले. सोबत आलेल्या आर्किटेक्टला त्यांनी रोपट्याला धक्का न लावता बांधकाम करण्याची सूचना केली. त्यासाठी त्यांनी बंगला थोडा पुढे आला तरी चालेल,असे सांगितले. घराच्या भोवती सफरचंद व चेरीची रोपे लावली जात आहेत. घर बांधून तयार झाल्यानंतर जवळच फळबागही असेल. घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही देवदारची झाडे लावण्यात आली आहेत.