आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPच्या रणांगणात BJP चे 200 प्रोफेशनल्स, काँग्रेसचे स्ट्रॅटिजिस्ट प्रशांत यांना टक्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना 2019 ची चिंता लागली आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग भाजप करीत आहे. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना 2019 ची चिंता लागली आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग भाजप करीत आहे.
लखनऊ - भारतीय जनता पक्षाला कधीकाळी पार्टी विथ डिफरंट म्हटले जात होते, मात्र आता जे सगळे करतात तेच भाजपही करीत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे स्ट्रॅटिजिस्ट ( निवडणूक रणनीतीकार) प्रशांत किशोर यांना टक्कर देण्यासाठी भाजपने 200 प्रोफेशनल्सची टीम मैदानात उतवली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्ट्रॅटिजी तयार केली आहे. भाजप घराघरात पोहोचवण्यासाठी पक्षाने 200 प्रोफेशनल्सची 'ब्रिलियंट माइंड्स' ही एक टीम तयार केली आहे. काँग्रेसचे स्ट्रॅटिजिस्ट प्रशांत किशोर यांना तोडीस तोड देण्यासाठी ही टीम काम करणार असल्याचे बोलले जाते. लोकसभेनंतर प्रथमच भाजपने एवढी मोठी टीम मैदानात उतवली आहे. लोकसभेत स्वतः प्रशांत किशोर भाजपची स्ट्रॅटिजी ठरवित होते, हे विशेष.

चांगला रिझल्ट मिळाला तर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीची जबाबदारीही
- सूत्रांच्या माहितीनुसार, 'ब्रिलियंट माइंड्स' टीमने उत्तर प्रदेश विधानसभेत चांगला रिझल्ट दिला तर आगामी लोकसभा (2019) निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची धुरा याच टीमच्या खांद्यावर दिली जाऊ शकते.
- या प्रोफेशनल्स टीमला असोसिएशन ऑफ ब्रिलियंट माइंड्स नाव देण्यात आले आहे.
- लोकसभेते भाजप सोबत असलेले, बिहारमध्ये नितीशकुमारांना जिंकवून देणारे आणि आता काँग्रेससोबत असलेल्या प्रशांत किशोर यांना ही टीम टक्कर देणार आहे.
काय करणार 'ब्रिलियंट माइंड्स'
- भाजपच्या या टीममध्ये 200 प्रोफेशनल्स आहेत. टीमच्या एका सदस्याने सांगितले, 'आमच्यामध्ये कोणीही प्रमुख नाही. सर्वांना वेगवेगळी कामे देण्यात आली आहे.'
- टीम राज्यातील तरुण, शहरी आणि मध्यमवर्गीयांमध्ये जाऊन त्यांची प्राथमिकता कशाला आहे हे समजून घेणार आहे.
- लोकांच्या प्राथमिक गरजा कळाल्यानंतर टीम भाजपला निवडणूक स्ट्रॅटिजी आणि जाहीरनामा तयार करण्यासाठी मदत करेल.
टीममध्ये IIT आणि IIM पासआऊट विद्यार्थी
- भाजपच्या प्रोफोशनल टीममध्ये दोन डझनहून अधिक आयआयटी आणि आयआयएम पासआऊट विद्यार्थी आहेत. टीम गेल्या 15 दिवसांपासून राज्यातील विविध भागात फिरून काम करत आहे.
- टीम जनमत जाणून घेऊन त्याचा फिडबॅक देण्याबरोबरच आयडिया देखिल देण्याचे काम करणार आहे.
- सूत्रांची माहिती आहे, की अमित शहांनी नुकत्याच झालेल्या लखनऊ दौऱ्यात या टीमबरोबर बराचवेळ चर्चा केली.
- टीमच्या एका सदस्याने सांगितले, 'नजीकच्या काळात निवडणूक मॅनेजमेंटची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आम्ही राजकीय पक्षांची हीच गरज भागवत आहोत. आम्ही विचारधारेनेही भाजपच्या जवळचे आहोत.'

मोदींनी दिले ग्रीन सिग्नल
- अशी माहिती आहे, की असोसिएशन ऑफ ब्रिलियंट माइंड्ससह गुजरातच्या काही तरुणांनी भाजपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी मोदींना प्रझेंटेशन दिले. त्याने प्रभावित झालेल्या पंतप्रधानांनी शहांची भेट घेण्याचे सुचविले.
- शहांनी या टीमचा उपयोग उत्तर प्रदेशमध्ये करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेससाठी काम करणारे प्रशांत किशोर होते भाजपचे स्ट्रॅटिजिस्ट
- 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची रणनीती ठरविण्याचे काम मोदींनी प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वातील सिटीझन फॉर अकांउटेबल गव्हर्नंन्स (सीएजी)
संस्थेला दिले होते.
- किशोर यांची रणनीती कामी आली आणि मोदींना देशात मोठा विजय मिळाला मात्र त्यानंतर सीएजीसोबतचा करार त्यांनी मोडला.
- भाजपसोबतचा करार मोडल्यानंतर प्रशांत किशोर आपले गृहराज्य बिहारमध्ये गेले आणि नितीशकुमार यांच्या जेडीयूसोबत काम करु लागले. त्यांनी नितीशकुमारांना पुन्हा सीएम करण्याची जबाबदारी यशस्वी पार पाडली. आता ते उत्तर प्रदेशात काँग्रेस सोबत आहेत.
- सूत्रांची माहिती आहे, की भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी प्रोफेशनल्सची एक मोठी फळी हवी आहे, जी पक्षाच्या प्रचाराची स्ट्रॅटिजी ठरवू शकेल.
- पक्षाने आसाम विधानसभेआधी भाजपच्या रजत सेठी यांच्या नेतृत्वातील व्यावसायिकांच्या एका टीमला निवडणूक प्रचाराची दिशा आणि व्हिजन डॉक्यूमेंट तयार करण्याची जबाबदारी दिली होती.
- निवडणुकीनंतर रजत सेठी यांना झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांचे सल्लागार म्हणुन बढती देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...