आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू परिवाराची 175 कोटींची मालमत्ता सील, प्राप्तिकर विभागाकडून अंतिम आदेश जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बेनामी मालमत्ता प्रकरणात सोमवारी प्राप्तिकर विभागाने राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची एक डझनपेक्षा जास्त मालमत्ता सील करण्याचे अंतिम आदेश जारी केले. 

यात पाटण्यातील नऊ भूखंडांचाही समावेश आहे. यातील एका प्लॉटवर राज्यातील सर्वात मोठ्या मॉलचे बांधकाम सुरू झाले होते. याशिवाय दिल्लीच्या पालम विहारचे फार्म हाऊस भूखंडासह एक घराचाही समावेश आहे. गेल्या २९ अॉगस्टला माजी मुख्यमंत्री राबडीदेवी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या चौकशीच्या दोनच आठवड्यांत प्राप्तिकर खात्याने ही कारवाई केली. 

यापूर्वी खात्याने १९ जूनला दिल्ली ते पाटणा-दानापूरपर्यंत लालू प्रसाद, मिसा भारती, शैलेशकुमार, तेजस्वी यादव, राबडी देवी त्यांच्या दोन मुली रागिणी चंदा यादव यांच्याशी संबंधित मालमत्ता तात्पुरत्या सील केल्या होत्या. त्यांचे एकत्रित मूल्य १७५ काेटी रुपये सांगितले जाते. १६ मे राेजी प्राप्तिकर खात्याने लालू कुटुंबाशी निगडित २२ ठिकाणी छापे मारले हाेते. 
बातम्या आणखी आहेत...