आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : आई, बहिण, वहिणीच मुलींना शिकवते पुरुषांना खुश करण्याच्या पद्धती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायवेवर उभ्या अशलेल्या बांछडा समुदायाच्या तरुणी. - Divya Marathi
हायवेवर उभ्या अशलेल्या बांछडा समुदायाच्या तरुणी.
इंदूर/ मंदसोर/नीमच - हा परिसर जगभरात अफूच्या शेतीसाठी ओळखला जातो. अफगाणिस्तान, लॅटिन अमेरिका, मॅक्सिकोसह अफू उत्पादकांच्यास यादीत भारतातील हा परिसरही कुप्रसिद्ध आहे. सरकारी नियंत्रणात अफू उत्पादन करणाऱ्या राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या मंदसोर, नीमच आणि रतलाम जिल्ह्यांत देहव्यापाराचे एक मोठे नेटवर्कही आहे. याठिकाणी बांछडा समुदायात परंपरेच्या नावाखाली मुली, सुना आणि पत्नींना बायकांना देहव्यापारात ढकलले जाते. हेच या परिसरात देहव्यापार वाढण्याचे मुख्य कारण आहे. देहविक्री करून पोट भरण्यात काहीही गैर नसल्याची भावना असलेल्या या समुदायात आई-वडिलच मुलींना या व्यवसायात उतरवतात. विशेष म्हणजे घरातील महिलाच वयात आलेल्या मुलींना पुरुषांना खुश करण्यासाठी धडे देतात.

विशेष म्हणजे हा व्यवसाय आता हळूहळू हायप्रोफाईल आणि हायटेक होत आहे. या व्यवसायात अडकलेल्या कमी वयाच्या मुलींचे राहणीमानही पूर्णपणे बदलले आहे. जीन्स टीशर्ट परिधान करणाऱ्या या तरुणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन, इंटरनेट आणि व्हॉट्स अपचा वापर करू लागल्या आहेत.

आई, बहिण, वहिणी शिकवतात पुरुषांना खुश करण्याची शक्कल
बांछडा समुदायात घरातील बहिणी, मुलींना देहव्यापाराच्या धंद्यात उतरवण्याची पद्धत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या समुदायाचे लोक यात काहीही गैर नसल्याचे मानतात. त्याउलट घरातील मोठी बहिण, आई किंवा वहिणीच नव्या मुलींना पुरुषांना खूश करे करायचे त्याचे धडे देतात.

ड्रेसिंग बदलली आणि ग्राहकांना आकर्षित करण्याची पद्धतही
रतलाम, नीमच आणि मंदसोर पासून जाणाऱ्या हायवेवर रोज सायंकाळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळते. येथे असलेल्या जवळपास प्रत्येक ढाब्याजवळ किंवा चहाच्या दुकानाजवळ काही तरुणींच्या टोळी आढळून येतात. स्लीव्हलेस सलवार, टी शर्ट, जीन्स किंवा इतर मॉडर्न वेशभुषेतील या तरुणी हायवेजवळ विटी दांडू किंवा इतर खेळ खेळताना आढळून येतात. त्याचवेळी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरू होतो. या मुलींच्या घरात किंना डेऱ्यात जातात त्यांची हाय फाय लाईफस्टाइल दिसते. स्मार्ट फोन, इंटरनेट आणि अॅप्सचा सहज वापर करताना त्या आढळून येतात.
(Video पाहा शेवटच्या स्लाइडवर)

प्रत्येकीकडे स्मार्टफोन आणि मैत्रिणींचे फोटो
नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांच्यापैकी एका तरुणीने सांगितले की त्यांच्या गावातील बहुतांश मुलींनी आधुनिक प्रकारच्या कॅमेऱ्यांचे फोन खरेदी केले आहेत. त्याद्वारे त्या मैत्रिणींचे फोटो आणि व्हिडिओही तयार करतात. जर एखाद्या ग्राहकाने दुसऱ्या एखाद्या मुलीची मागणी केले तर त्या लगेचच फोनमध्ये त्याला दुसऱ्या मुलींचे फोटो, व्हिडिओ दाखवतात, गरज अस्यास व्हाट्स अपवर मॅसेजही करतात.

मुलीसाठी केला जातो नवस, तिच्याच जीवावर चालते घर
बांछडा समुदायातील लोक घरी मुलगीच जन्माला यावी यासाठी नवस करतात. तिचे पालनपोषणही विशिष्ट पद्धतीने केले जाते. थोडी मोठी झाल्यानंतर घरातील इतर महिला तिला पुरुषांना खुश करण्याच्या पद्धती शिकवत असतात. त्यानंतर तिला या व्यवसायात उतरवले जाते. एका अंदाजानुसार बांछडा समुदायाच्या सुमारे एक हजारपेक्षा अधिक मुली देह व्यापारामध्ये अडकलेल्या आहेत. या समाजातील पुरुषही त्यांच्याच कमाईवर अवलंबून असतात. ते स्वतः काहीही काम करत नाहीत.

उज्जेन रेंजचे पोलिस महासंचालक मधुकुमार बाबू यांनी याबाबत बोलताना सांगितले की, याबाबत त्यांना माहिती मिळाली आहे की, हे लोक आता हायटेक पद्धतींचा वापर करत आहेत. पोलिसांनी गेल्या काही दिवसांत नीमच आणि रतलाममध्ये यांच्या विरोधात कारवाई केली आहे. पण मुख्य अडचण म्हणजे या समुदायाचे लोक यात काहीही गैर नसल्याचे मानतात. केवळ कायदा अशा वाईट प्रवृत्ती संपवू शकत नाही. समाजाची जागरुकता त्यावर एकमात्र उपाय आहे.


पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित Photo आणि अखेरच्या स्लाईडवर VIDEO