रायपूर- छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये पोलिसांनी एका हायप्रोफाइल कुंटणखान्याचा पर्दाफास केला आहे. पोलिसांनी एका उच्चभ्रू परिसरातील एका बंगल्यातून तीन महिलांसह एका युवकाला अटक केले आहे. महिला नशेत तर्रर्र होत्या. भाड्याच्या बंगल्यात या महिला सेक्स रॅकेट चालवत होत्या.
रायपूरमधील तिल्दा भागातील एक बंगल्यात पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. पोलिसांनी तीन महिलांसह एका युवकाला अटक केले आहे. दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी युवकाकडून एक पिस्तूल जप्त केली आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी टाकला छापा...
- रायपूरमधील सिंधी कॅम्प तिल्दा येथील एका बंगल्यात सोमवारी दुपारी 3 महिला गेल्या.
- काही वेळानंतर बंगल्यातून शिविगाळ व गोंधळ घातल्याचा आवाज आल्यानंतर परिसरातील काही लोकांनी फोन करून नेवरा पोलिसांना माहिती दिली.
-पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बंगल्यात प्रवेश करून तीन महिला व एका युवकाच्या मुसक्या आवळल्या.
नशेत तर्रर्र होते आरोपी...
- पोलिसांनी बंगल्याला घेरल्यानंतर बंगल्या प्रवेश केला. पोलिसांना पाहाताच दोन तरुणांनी बंगल्यातून पळ काढला.
-एका खोलीत तीन महिला एका युवकासोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या. सर्व जण नशेत तर्रर्र होते.
- अटक केलेल्या युवकाचे नाव हरप्रीत हँप्पी आहे.
पोलिसांनी जप्त केली बनावट पिस्तूल...
- पंजाबमधील राहाणारा हरप्रीत हॅप्पी (22 वर्ष) हा त्याच्या 8-10 मित्रासोबत भाड्याने बंगल्यात राहात होता.
- हरप्रीतकडून पोलिसांनी एका पिस्तूल जप्त केली आहे. पण ती बनवटी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)