आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिस्‍कशन फोरमवर बंदी: IIT मद्रास बाहेर आंदोलन, अनेकांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- आयआयटी मद्रास कॅम्पसमधील एका विद्यार्थ्यांच्या डिस्कशन फोरमवर बंदी घालण्याच्या विरोधात आज द डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI ) ने जोरदार आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आणि एचआरडी मिनिस्टर स्मृती ईरानी यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. ज्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. यादरम्यान पोलिस आणि आंदोलकर्त्यांत जोरदार वाद झाला.
DYFI च्या एका स्वयंसेवकाने सांगितले की, तामिळवाडूत 'आरएसएसचा अजेंडा' लागू होऊ दिला जाणार नाही. आंदोलनाची तीव्रता पाहून पोलिसांनी कॅम्पसमधील सुरक्षा वाढवली. दरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे. एनएसयूआयने शुक्रवारी मंत्री स्मृती इराणी यांच्या दिल्लीतील घराबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर स्मृती यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला होता.
एचआरडीने बंदीपासून घेतली फारकत-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमओने यासंदर्भातील अहवाल मागवला आहे. दुसरीकडे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी मद्रासच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या डिस्कशन फोरमवर बंदी घालण्याशी आमचा संबंध नाही असे म्हटले आहे. एचआरडीने म्हटले आहे की, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएचसी) द्वारे पंतप्रधान मोदींविरोधात पसरवण्यात येत असलेल्या माहितीविरोधात केलेली कारवाई आयआयटी मद्रासने नियमानुसार व गाईडलाईन्स नुसारच केली आहे.
एज्युकेशन सेक्रेटरी सत्या एन मोहंती यांनी म्हटले आहे की, आयआटी एक स्वायत्त संस्था आहे. अशावेळी एचआरडी मंत्रालयाचा या घटनेशी काहीही संबंध नाही. आमच्याकडे तक्रार आली आहे जी आम्ही आयआयटी मद्रासला फॉरवर्ड केली होती. आम्ही या प्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. आयआयटी मद्रासने आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...