आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मतदानासाठी गेलो होतो, दगडफेक करणारा समजून जीपवर बांधले -पीडित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये एका युवकाला लष्करी जीपच्या बोनटवर बांधून फिरवले जात असल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. याच व्हिडिओतील पीडित फारुख अहमद दार याने आपल्यावर बेतलेल्या परिस्थितीचे वर्णन केले. 9 एप्रिल रोजी मतदान करून बहिणीच्या घरी जात असतानाच आपल्याला दगडफेक करणारा समजून लष्करी जीपवर बांधण्यात आले असा दावा त्याने केला. 
 
व्हिडिओतील युवक म्हणाला...
- पीडित युवक दारने सांगितल्याप्रमाणे, त्याला लष्करी जीपच्या बोनटवर बांधून अनेक मतदान केंद्रांवर फिरवण्यात आले. लष्करी जीपवर टांगूनच जवानांनी 10 ते 12 गावांचा दौरा केला. प्राथमिक तपासानुसार ज्या जीपवर दारला बांधण्यात आले ती 53 राष्ट्रीय रायफल्सची जीप होती.
 
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तो व्हिडिओ ट्वीट करून लिहिले होते, "या युवकाला जीपवर बांधण्यात आले आहे, जेणेकरून कुणीही लष्करावर दगडफेक करणार नाही. ही बाब धक्कादायक आहे." व्हायरल होणारा व्हिडिओ श्रीनगरच्या अनंतनाग येथील लोकसभा 
पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी टिपण्यात आला. यामध्ये दगडफेक करणाऱ्यांचे असेच हाल होतील असे आवाज सुद्धा ऐकू येत आहेत. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. 
 
सखोल चौकशीची मागणी
- माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी वादग्रस्त व्हिडिओ आणि फोटो जाहीर करून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. तसेच यावर किती माध्यम आणि दैनिक चर्चा करतात हे पाहू असे म्हणत माध्यमांचा सुद्धा समाचार घेतला. 
- सीआरपीएफ जवानांच्या अपमानाचा व्हिडिओ जाहीर होताच त्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या व्हिडिओवर कुणीही चर्चा सुद्धा करण्यास तयार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती. 
 
दगडफेक थांबत नाही म्हणूनच गोळीबार
- सुत्रांच्या माहितीनुसार श्रीनगरच्या अनंतनाग येथे पोटनिवडणूक दरम्यान हिंसाचार सुरू असताना दगडफेक थांबवण्यासाठी संबंधित युवकाला जीपवर बांधण्यात आले होते. त्याला 100 मीटर पर्यंत बांधून फिरवण्यात आले होते. बडगामच्या बीरवाह येथून लष्कर आणि निमलष्करी दलाचा ताफा जात असताना लोक छतांवर आले आणि सुरक्षा रक्षकांवर दगडफेक सुरू केली. परिस्थिती एवढी बिघडली होती, की सुरक्षा रक्षकांना गोळीबार सुद्धा करावा लागला. 
 
महबूबा मुफ्ती यांनीही केला विरोध
- मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल मागितला आहे. अशा प्रकारच्या घटनांवर दुर्लक्ष करता येणार नाही असेही त्या पुढे म्हणाल्या. यासोबतच, माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर बोलताना, त्यांनी 2010 मध्ये कठोर कारवाई केली असती तर, दगडफेकीवर आळा बसला असता. असे म्हटले आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा... दगडफेक रोखण्यासाठी युवकाला लष्करी जीपच्या बोनटवर बांधून फिरवले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...