आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब: विधानसभेत आमदारांनी मंत्र्यांवर फेकले जोडे, सभापतींच्या दिशेने कॅग रिपोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड (पंजाब) - पंजाब विधानसभेत बुधवारी मोठा गदारोळ झाला. काँग्रेसच्या संतप्त आमदारांनी कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांच्या दिशेने बूट भिरकावला तसेच अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली.

राज्य सरकारच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी दोन रात्रींपासून विधानसभेच्या सभागृहात मुक्काम ठोकला आहे. त्यांनी सभागृह सोडण्यास नकार दिला आहे. त्यावरून सध्या तेथे पेच निर्माण झाला आहे. सभागृहाचे कामकाज बुधवारी सुरू होताच काँग्रेसच्या आमदारांनी आपली मागणी लावून धरली. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज स्थगित करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू होताच काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांची मागणी लावून धरली. काँग्रेसच्या सदस्यांनी आपल्या हातातील कॅगच्या अहवालाची कागदपत्रे अध्यक्ष अटवाल यांच्याकडे भिरकावली.
11 मुद्दद्यांवर चर्चेसाठी अडून बसले काँग्रेस आमदार
- विरोधीपक्षाने 11 मुद्दद्यांवरुन सरकारला घेरले आणि अविश्वास प्रस्ताव मांडला होता. तो विधानसभाध्यक्षांनी फेटाळून लावला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदरांनी बुधवारी सभागृहात गदारोळ सुरु केला.
- बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच काँग्रेस आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली.
- यावेळी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत विधानसभाध्यक्षांच्या दिशेने कॅग रिपोर्ट भिरकावण्यात आला.
- विधानसभाध्यक्षांनी सभागृहातील संतप्त वातावरण पाहून 15 मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.
- कामकाज स्थिगत झाल्यानंतरही आमदारांचा गोंधळ काही थांबला नाही. याच दरम्यान कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर जोडा फेकण्यात आला.
सोमवारी रात्री सभागृहात मुक्कामी होते आमदार
- काँग्रस आमदारांनी सोमवारीही 11 मुद्दद्यांवर चर्चा करण्याची मागणी केली होती.
- मात्र अकाली सरकार चर्चेला तयार नाही हे पाहून काँग्रेसच्या 30 आमदारांनी सोमवारी रात्री सभागृहात मुक्काम केला.
- मंगळवारी त्यातील एका आमदारांची प्रकृती बिघडल्याने ते बाहेर गेले.
- काही आमदार स्नान करण्यासाठी बाहेर गेले तर त्यांना सुरक्षा रक्षकांनी पुन्हा सभागृहात येऊ दिले नाही.
- यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी मंगळवारी चंदीगड हायकोर्टसमोर सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. बीबी राजिंदर कौर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रात्रीही सभागृहात मुक्कामाला होते विरोधी आमदार,
> आमदार सुनील जाखड असे आले विधानसभेत
बातम्या आणखी आहेत...