आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Protests Continue Over Telangana, Two More Ministers Quit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणाविरोधात आणखी दोन मंत्र्यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणा राज्यनिर्मितीच्या मुद्दय़ावरून आंध्र प्रदेशच्या किरणकुमार रेड्डी मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री मुरली मोहन व वनमंत्री शत्रुचार्ला राजू यांनी सोमवारी राजीनामे दिल्याने मंत्रिमंडळ सोडणार्‍यांचा आकडा 11 वर पोहोचला आहे.

काँग्रेसचे तेलंगणाविरोधी नेते मंगळवारी दिल्लीत र्शेष्ठींसमोर आपला विरोध व्यक्त करणार आहेत. दरम्यान, संसदेत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तेलंगणानिर्मितीची तारीख निश्चित नसल्याचे सांगितले. सरकारकडून तेलंगणा राज्यनिर्मितीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर सीमांध्र आणि रायलसीमामध्ये आंदोलने होत आहेत. मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डींसह अनेक आमदार-खासदार व मंत्रीही या निर्णयाला विरोध करत आहेत. पक्षातील 30 पेक्षा अधिक आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिलेले आहेत.