आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PS Shalini Commendation, Read Their Success Stories

SUCCESS STORY - वाहकाची मुलगी बनली 'आयपीएस अधिकारी'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - साधारण परिवारामध्‍ये लहानची मोठी झालेली शालिनी अग्निहोत्री साध्‍या वाहकाची मुलगी आहे. तिचा आयपीएस अधिकारीपर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा आहे. शालिनी आता शिमल्‍याच्‍या आयपीएस अधिकारी म्‍हणून पदभार सांभाळत आहे.
मुलांपेक्षा एक पाऊल पुढे
मुली कोणत्‍याचा क्षेत्रामध्‍ये मुलांपेक्षा कमी नसून एक पाऊल पुढे आहेत. त्‍यांना उच्‍चशिक्षि‍त करा. माझी आई दहावी पास असल्‍याने मला गृहपाठामध्‍ये मदत करायची. असे शालिनी म्‍हणाली. ती पुढे म्‍हणाली, की मला एक बहीण आणि एक भाऊ आहे. बहीण रजनी डॉक्‍टर असून भाऊ आशिष इंडियन आर्मीच्‍या एनडीएमध्‍ये प्रशिक्षण घेत आहे. माझ्या आई- वडिलांनी घरामध्‍ये मुलगा- मुलगी असा भेद न करता सर्वांना समान शिक्षण दिले. त्‍यामुळेच मी आयपीस होऊ शकले. सध्‍या माझे प्रशिक्षण सुरु असून 2014 पर्यंत माझे प्रशिक्षण सुरु असणार आहे. सध्‍या मी कलेक्‍टर ऑफीस, ज्‍युडिशियल ऑफीस, डीसी ऑफीस यांचे कामकाज पाहत आहे.
आईची मदत
शालिनी अग्निहोत्री ठठ्ठल गावातील पहिली आयपीएस पोलिस अधिकारी आहे. शालिनी रात्री तीन वाजेपर्यंत अभ्‍यास करत असायची. दिवसभर कॉलेज करून रात्री आयपीएसच्‍या परीक्षेची तयारी करायची. शालिनीचे वडील एचआरटीसीत वाहक आहेत. आई गृहिणी आहे. धर्मशालेतील पब्लिक स्‍कुलमध्‍ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. तर पंजाब कृषी विद्यापीठात तिने एमएस्‍सीचे शिक्षण घेतले.
गावामध्‍ये जागरुकता
अत्‍यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन शालिनी आयपीएस झाल्‍याने गावामध्‍ये शैक्षणिकद्ष्‍टया प्रगती झाली आहे. तिचा आदर्श मुली घेत असून शिक्षण घेत आहेत. गावातील मुली मुलांपेक्षा सर्वच क्षेत्रांमध्‍ये टॉपर आहेत; तर प्रत्‍येक कुटंबातील मुलीला शिक्षण्‍ा दिले जात आहे. 'समाजाचे मन:परिर्वतन व्‍हायला हवे', असे शालिनीला वाटते.
आतापर्यंत राहिली टॉपर
शालिनीने युपीएससीची परीक्षा मे 2011 मध्‍ये दिली होती. 2012 मध्‍ये ती मुलाखतीसाठी पात्र ठरली. संपूर्ण भारतामधून तिला 285 व्‍ये मानांकन मिळाले होते. डिसेंबर 2012 मध्‍ये हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी रुजू झाल्‍यानंतर 148 जणांच्‍या तुकडीमध्‍ये ती टॉपर राहिली.
शालिनीची छायाचित्रे पाहण्‍यासाठी, पुढील स्‍लाइडवर क्लिक करा