आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळणाऱ्या पोरांना भारतरत्न दिल्याने त्याचे मुल्य घटले - पं. हरिप्रसाद चौरसिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी भारतरत्न पुरस्कारावर वादग्रस्त वक्तव्य केले. - Divya Marathi
पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी भारतरत्न पुरस्कारावर वादग्रस्त वक्तव्य केले.
जयपूर - भारतरत्न कोणाले द्यावे आणि कोणाला देऊ नये यावरुन पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. सचिन तेंडुलकरचे नाव न घेता कमी वयातील खेळाडूंना पुरस्कार दिल्याने या सन्मानाचे मुल्य कमी झाल्याची टीका प्रसिद्ध बासरीवादक  पद्मविभूषणने सन्मानित पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी केली आहे. हा पुरस्कार भारतीय संस्कृतीची जोपासना करणाऱ्या कठोर तपस्वींना मिळावा अशी अपेक्षाही चौरसिया यांनी व्यक्त केली आहे. 
 
सचिनचे नाव घेताच स्मित हास्य करत शांत राहिले... 
किशोरी अमोनकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पं. हरिप्रसाद चौरसिया जयपूर येथे आले होते. यावेळी DainikBhaskar.com सोबत बोलताना त्यांनी अमोनकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. 
- देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न बद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले. 
 
नेमके काय म्हणाले पं. हरिप्रसाद
- सचिन तेंडुलकरचे नाव न घेता ते म्हणाले, 'खेळाशी संबंधीत मुलाला भारतरत्न दिल्याने या पुरस्काराचे मुल्य कमी झाली आहे. कमी वयाच्या लोकांना हा पुरस्कार देण्यापेक्षा कठोर तपस्या करून भारतीय संस्कृतीची जोपासना करणाऱ्या 'उम्रदराज' लोकांचा या पुरस्काराने सन्मान केला पाहिजे.'
- पं. हरिप्रसाद यांना जेव्हा विचारण्यात आले, की तुम्ही सचिन बद्दल बोलत आहात का, त्यावर त्यांनी स्मित हास्य केले आणि ते शांत राहिले. 
- क्रिकेटर सचिन तेंडुलकरला 2014 मध्ये भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते.
 
पुढील स्लाइडवर, पं. हरिप्रसाद काय म्हणाले किशोरी अमोनकरांबद्दल... 
बातम्या आणखी आहेत...