आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू : नवज्योतसिंग सिद्धू यांच्या ताफ्यावर हल्ला, संतप्त नागरिकांनी केली दगडफेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - एका सभेतील नवज्योत सिद्धू यांचा फोटो
जम्मू - भाजपचे माजी खासदार आणि नेते नवज्योत सिद्धू यांच्या ताफ्यावर जम्मू येथे हल्ला करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या एका प्रचारसभेसाठी जात असताना सिद्धू यांच्यावर हा हल्ला झाला. सिद्धू यांच्या एका जुन्या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत सिद्धू यांच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. सिद्धू यांची ही सभा बोर कॅम्प परिसरात होणार होती.

जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजप सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्यासाठीच जम्मू काश्मीरमध्ये प्रचारासाठी भाजपने अनेक बड्या नेत्यांना मैदानात उतरवले आहे. सिद्धू हेही त्याच नेत्यांपैकी एक आहेत. येथील पाचव्या टप्प्यात होणा-या 20 जागांच्या निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. या मतदारसंघांमध्ये शीख मतदारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी सिद्धू यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. पण सिद्धू यांच्या एका जुन्या वक्तव्याच्या कारणावरून रागावलेल्या शीख समुदायाच्या नागरिकांना सिद्धू यांच्या ताफ्यावर हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये सिद्धू पूर्णपणे सुरक्षित असले तरी, दोन सुरक्षा रक्षक आणि इतर काही लोकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र यावेळी सिद्धू यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नारेबाजी झालेली पाहायला मिळाली. तसेच दगडफेकीमध्ये सिद्धू यांच्या गाडीच्या काचाही फुटल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सिद्धू यांच्या रॅलींचे काही PHOTO