आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : मूर्ती विसर्जनावेळी डीजे बंद केल्याने संतप्त जमावाने जाळल्या पोलिसांच्या गाड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : डीजे बंद केल्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.

छपरा/पटना - छपरामध्ये सोमवारी मूर्ती विसर्जनावेळी डीजे केल्याने संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना अटकही केली आहे. त्यांना सोडवण्यासाठी संतप्त लोकांनी त्यांना सोडवण्यासाठी पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या प्रकारात पोलिसांचे काही जवानही जखमी झाले.

गाड्या जाळल्या
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही लोक सोमवारी सकाळी डीजे वाजवत मूर्ती विसर्जनासाठी जात होते. अर्ध्यातच पोलिसांनी त्यांना डीजे बंद करण्यास सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे गोंधळ झाला. संतापलेल्या जमावाने पोलिसांची जीप, जेसीबी मशीन आणि दोन ट्रॅक्टर जाळून टाकले. पोलिसांनी लगेचच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर लोकांनी तेथून पळ काढला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO