आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public Get Violent While Protest Against Child Molestation At School

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याने संतप्त गर्दीने केली तोडफोड, गाड्यांची जाळपोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - शहरातील एका शाळेत 8 वर्षीय मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी बुधवारी तीव्र आंदोलन केले. पोलिस या प्रकरणी 63 वर्षीय आरोपी शिक्षकाला अटक करून चौकशीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी शाळेच्या बाहेर जमलेल्या गर्दीने त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पोलिसांनी गर्दीला आवरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नागरिकांनी पोलिस व्हॅनची तोडफोड करत ती जाळून टाकली.
त्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली. त्यात काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला.

परिस्थिती नियंत्रणात
सध्या याठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त एम.एन. रेड्डी यांनी घटनास्थळी पोहोचत पाहणी केली. आरोपीला न्यायालय शिक्षा देईल, गर्दीला अशा प्रकारे शिक्षा देण्याचा अधिकारी नाही, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, याआधीही आरोपीचे नाव अशा प्रकारच्या प्रकरणात अडकले होते, असे समजत आहे.

एकापाठोपाठ एक प्रकरणे
गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी शाळा परिसरांत मुलांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानुसार परिसरात सीसीटीव्ही आणि स्कूल बसमध्ये जीपीएस लावणे अनिवार्य करण्यात आले होते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सुमारे 200 शाळांना या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आंदोलनाचे PHOTO