आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यातील 3 विद्यार्थ्‍यांची नक्षलवाद्यांकडून सुटका, बस्‍तर पोलिसांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेच तीन विद्यार्थी बेपत्‍ता आहे. - Divya Marathi
हेच तीन विद्यार्थी बेपत्‍ता आहे.
रायपूर/पुणे - भारत जोडो अभियानाअंतर्गत सायकल प्रवासाला निघालेल्या पुण्यातील आदर्श पाटील, बिलाश वकाले आणि श्रीकृष्ण शेवाळे या तीन विद्यार्थ्यांचे नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या जगदलपूरजवळील बिजापूर ते बासागुडा या मार्गावरून अपहरण केले होते. या तिघांचीही नक्षलवाद्यांकडून सुटका झाल्‍याची अधिकृत माहिती बस्‍तर पोलिसांनी दिली आहे. सध्‍या हे तिघेही पोलिसांकडे सुरक्षित आहेत.
20 डिसेंबर रोजी पुण्यातील एका मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे हे विद्यार्थी प्रवासासाठी निघाले होते. 10 जानेवारी रोजी त्यांना ओडिशात पोहोचायचे होते. मात्र, ते कुठे गेले याबाबत कोणतीही माहिती नव्‍हती. खळबळून जागे झालेल्‍या पोलिसांनी या विद्यार्थ्‍यांचा तपास सुरू केला. सध्‍या बस्‍तर पोलिसांकडून तिघांच्‍या सुटकेची माहिती समोर आली आहे.
का वाढला अपहरणाचा संशय
- महाराष्‍ट्रातून निघालेल्‍या या विद्यार्थ्‍यांना छत्तीसगडमधून 10 जानेवारीला ओडिशाला पोहोचायचे होते.
------------
- पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या मुलांचे मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता शेवटचे लोकेशन बासागुडा (बिजापूर) असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा संपर्क होत नसल्याने नक्षलवाद्यांकडून अपहरणाचा संशय व्यक्त होत होता.
------------
- पोलिसांनीही तसा संशय व्‍यक्‍त केला.
------------
- छत्तीसगडच्या गुप्तहेर खात्यातील अधिकारी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते.
------------
- छत्तीसगडमध्ये प्रवेश केल्यानंतर बिजापूरच्या बेदरे व कुटरूपर्यंत ते पोहोचले होते.
------------
- भैरमगढवरून सुकमामार्गे ओडिशाच्या कालाहांडी, मलकानगिरीवरून 10 जानेवारीला बालीमेलात पोहोचण्याचा या चार जणांचा बेत असल्याची माहिती काही वाटसरूंनी दिली आहे.
------------
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...