पाटणा - रेल्वच्या स्लीपर श्रेणीतील प्रवाशांसानांही ओळखपत्र अनिवार्य केले आहे. स्लीपर श्रेणीतून ओळखपत्राशिवाय प्रवास केल्यास तिकीट असले तरीही दंड होणार आहे.
आधी एसी वन, एसी टू, एसी थ्री अथवा चेअर कारमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवासी प्रवास करताना पकडला गेला तर त्याला दंड केला जात होता. रेल्वेने आता स्लीपर क्लासच्या प्रवाशांसाठीही या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश सर्व तिकीट तपासनिसांना देण्यात आले आहेत. रेल्वेने प्रत्येक प्रकारच्या तिकिटासाठी ओळखपत्र अनिवार्य केले आहे. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ अरविंद कुमार रजक यांनी सांगितले की, जानेवारी २०१५ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. सामान्य प्रवासी प्रवास करत असल्याने आतापर्यंत स्लीपरमधील प्रवाशांना ओळखपत्राची सक्ती केली जात नव्हती.