आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab And Haryana Court Acquits Two Including One Nepali In 1999 Kandahar Plane Hijack Case

कंदहार विमान अपहरण; 2 आरोपींची सुटका होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - कंदहार विमान अपहरणात मदत करणारे दोन आरोपी युसूफ नेपाळी व दलीप कुमार यांची सुटका होणार आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हत्येच्या कटाचा आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे दोघांना आर्म्स अँक्टअंतर्गत दोषी ठरवण्यात आले. याअंतर्गत मिळणारी तीन वर्षांची शिक्षा त्यांनी आधीच भोगली आहे.

मुख्य आरोपी अब्दुल लतीफला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही फेटाळण्यात आली. पतियाळाच्या सीबीआय न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपींच्या फाशीच्या शिक्षेसाठी सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.