आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांच्या कपाळावर ‘जेब कत्री’ गोंदवले, तीन पोलिसांना कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटियाला - चार महिलांच्या कपाळावर ‘जेब कत्री’ असे गोंदवण्याच्या १९९३ च्या खटल्यात तीन पोलिस अधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी झाली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पोलिसांनी ही शिक्षा ठोठावली.

पोलिस अधीक्षक सुखदेव सिंह चिन्ना, पोलिस उपनिरीक्षक नरिंदर सिंह माली व अन्य एकास सीबीआयचे न्यायमूर्ती बालजिंदर सिंह यांनी शुक्रवारी ही शिक्षा दिली. तिन्ही अधिकाऱ्यांना तीन वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. कपाळावर आक्षेपार्ह शब्द गोंदवण्यात आल्याचे हे प्रकरण १९९३ चे आहे. हे अधिकारी त्या वेळी अमृतसरमध्ये कार्यरत होते. त्यावरून पंजाब पोलिसांवर खूप टीका झाली होती. सदर महिलांना अनेक वर्षे कपाळ झाकून राहावे लागले. त्यांची बदनामी झाली होती.

खटल्याच्या सुनावणीत महिलांनी कपाळावरील टॅटू न्यायाधीशांना दाखवले आणि संपूर्ण हकिगत सांगितली. त्या घटनेवर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानेही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले होते. पीडितांनी १९९४ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बातम्या आणखी आहेत...