आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसमधून किडनॅप करुन केला बलात्कार, व्हिडिओ समोर आल्यानतंर झाली कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेच्या पाच दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. - Divya Marathi
घटनेच्या पाच दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला.
मुक्तसर (पंजाब) - येथील एका दलित महिलेचे ऑफिसमधून अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी गुरजिंदरने एका महिन्यानंतर आज (23 एप्रिल) आत्मसमर्पन केले. ही घटना 24 मार्चची आहे. आरोपी महिलेला ऑफिसमधून ओढत बाहेर नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरण तापले होते.


... तरी मदतीला कोणी पुढे आले नाही


- पीडित महिलेचा आरोप आहे, 'गुरजिंदरने तिला ऑफिसमधून किडनॅप केले आणि एका फार्म हाऊसवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिले.'
- महिला म्हणाली, 'जेव्हा बळजबरीने मला ऑफिसमधून ओढून नेले जात होते, तेव्हा कोणीही मदतीला पुढे आले नाही.'
- 'मदतीसाठी मी ओरडत राहिले, मात्र कोणीही पुढे आले नाही. पोलिसांनीही या प्रकरणात सुरुवातीला चालढकल केली, मात्र जेव्हा सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.'
- घटनेच्या पाच दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला.


कॉम्प्यूटर सेंटरवर काम करत होती महिला


- पोलिसांच्या माहितीनुसार, महिला एका कॉम्प्यूटर सेंटरवर काम करत होती.
- आरोपी आणि पीडिता एकाच गावातील आहेत. दोघे एकमेकांना ओळखत होते.
- ही घटना महिला काम करत असलेल्या ऑफिसजवळील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.


एनसीएससीकडेही केली तक्रार


- दलित महिला आणि तिच्या पित्याने या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडेही (एनसीएससी) केली आहे.
- आयोगाने पोलिसांना समन्स पाठविला आणि या प्रकरणातील तपास कुठपर्यंत आला याची विचारणा केली होती.
पुढील स्लाइडमध्ये, संबंधीत फोटो