आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्जच्या नशेत असे टल्ली होतात युवक-युवती, पंजाबमध्ये असा चालतो गोरखधंदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबमध्ये इंजेक्शन घेऊन नशा केला जातो. बहुतांश युवक- युवती ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. - Divya Marathi
पंजाबमध्ये इंजेक्शन घेऊन नशा केला जातो. बहुतांश युवक- युवती ड्रग्जच्या आहारी गेले आहेत.
चंडीगड- बॉलिवुडचा आगामी सिनेमा 'उडता पंजाब'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. या ट्रेलरमुळे दुसरीकडे पंजाब सरकार व अकाली दलाच्या नेत्यांची झोप उडाली आहे. ड्रग्जच्या नशेवरून पंजाब बदनाम झाल्याचा आरोप अकाली नेता व पंजाब सरकार करत आहे. पंजाब ड्रग्जच्या विळख्यात नसल्याचे स्पष्टीकरण सरकार जनतेला देत असताना उडता पंजाबचे ट्रेलर रिलीज झाले आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच गोची झाली आहे.

पंजाबमध्ये 70 टक्के युवक-युवती ड्रग्जच्या आहारी गेल्याचा दावा सिनेमाच्या ट्रेलरमध्ये करण्‍यात आला आहे. पंजाबमध्ये कसा चालतो ड्रग्जचा गोरखधंदा? हे दाखवण्यासाठी divyamarathi.com आपल्यासाठी काही फोटोज घेऊन आले आहे.

7,500 कोटी रुपयांचा ड्रग्जचा कारोबार...
- अखिल भारतीय आयूर्विज्ञान संस्थेने (AIIMS) जानेवरी 2016 मध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता . त्यानुसार पंजाबमध्ये वर्षाकाठी 7,500 कोटी रुपयांचा ड्रग्जचा कारोबार होतो.
- पंजाबला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेमुळे ड्रग्जची सहज तस्करी होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानातून ड्रग्ज मोठ्याप्रमाणात भारतात आणला जातो.
- एम्सच्या (NDDTC) सर्वेमध्ये पंजाबच्या 10 जिल्ह्यांचा समावेश आहे.
- रिपोर्टनुसार, या जिल्ह्यांमध्ये 2.77 कोटी लोकसंख्या आहे. त्यापैकी 1.23 कोटी लोक हिरॉइनचा नशा करतात.

हिरॉइनची सर्वाधिक विक्री शहरी भागात...
- सुरक्षा एजन्सीने दावा केला होता की, पाकिस्तानातून आलेला हिरॉइनचा वापर पंजाबमध्ये होत नाही.
- पंजाबमधून ते दिल्ली, मुंबई, पुणे, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये पाठवले जाते.
- एका मीडिया रिपोर्टनुसार, नशेखोर दररोज 20 कोटी रुपयांचा ड्रग्ज सेवन करतात.

पुढील स्लाइडवर वाचा, पंजाबमधील ड्रग्ज कारोबारशी संबंधित फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...