आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाबमध्ये त्रिशंकूची स्थिती, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड/अमृतसर - पंजाबमध्ये आता निवडणूक झाली तर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पंजाब विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. दुसऱ्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल यांचा आप असू शकतो. सत्तारूढ अकाली दल आणि भाजप आघाडी तिसऱ्या क्रमांकावर राहील. एका वृत्त वाहिनीच्या सर्वेक्षणानुसार, सर्व ११७ विधानसभा मतदारसंघांतील ६,५५२ लोकांची मते अाजमावण्यात आली. काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती मिळाली. सर्वेक्षणानुसार, सत्तारूढ अकाली दल-भाजपला सत्ताविरोधी कौल मिळू शकतो. गेल्या दोन निवडणुकीत सत्तारूढ आघाडी जिंकली आहे. २०१४ च्या
लोकसभा निवडणुकीनंतर सत्तारूढ आघाडीची मते आम आदमी पक्षाकडे वळल्याचे सांगण्यात येते. सर्वेक्षणानुसार, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अकाली-भाजप आघाडीच्या मतांचा वाटा २२ टक्के घसरला आहे. शिवाय याच आघाडीचे १९ टक्के मते काँग्रेसकडे गेली आहेत. काँग्रेस २०१४ च्या निवडणुकीतील ७४ टक्के मते कायम ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. आपचा आपल्या ८० टक्के मतांवर ताबा कायम आहे.
सिद्धूंचे स्वागत : अमरिंदर सिंग
नवज्योतसिंग सिद्धूंसह अनेकांनी विनाअट काँग्रेसमध्ये यावे, त्यांचे स्वागत असल्याचे पंजाब काँग्रेसचे प्रमुख नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले. बादल यांना हरविण्यासाठी अमरिंदर सिंग यांनी आधीच्या भूमिकेत थोडा बदल केला आहे. अमृतसर येथील राजासांसी मंडईमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.सिद्धू यांना राजकीय शिस्त नाही, काँग्रेसला त्यांची गरज नाही अशी टीका अमरिंदर यांनी याआधी केली होती. त्यांना पक्षात घेऊन जगमीत बराड यांची पुनरावृत्ती करायची नाही, अशी त्यांची भूमिका होती. अमरिंदर यांच्या भूमिकेत बदल होण्यामागची कारणे कोणती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सिद्धू यांना काँग्रेसमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस-आपसोबत चर्चा : सिद्धू
दरम्यान ‘आवाज ए पंजाब’चे ज्येष्ठ नेते सिमरजित सिंह बैस यांनीही म्हटले, सिद्धू यांच्यासमवेत दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत सिद्धू यांनी स्वत: सांगितले : काँग्रेस आणि आपसाेबत माझी बोलणी चालू आहेत. २० ऑक्टोबरपर्यंत काही ना काही निर्णय होईल. मला पदाची अपेक्षा नाही. अकाली दल-भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी आम्ही देणार नाही. ही युती जर सत्तेवर आली तर आम्हाला श्वास घेणेही अवघड होईल, असे सिमरजित सिंग यांनी म्हटले. आवाज ए पंजाबच्या नेत्यांमध्ये मजबूत एकी आहे. सिद्धूच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याच्या शक्यतेबाबत बोलताना कॅप्टन अमरिंदर यांनी म्हटले, पंजाबमध्ये अकाली शासन उलथून टाकायचे आहे. यासाठी अन्य कोणत्याही पक्षातील नेत्यांचे काँग्रेसमध्ये विनाअट स्वागत आहे.

अमरिंदरना काँग्रेसची खात्री नाही : सुखदेव ढिंढसा

चंदिगड | इतर नेत्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करण्याच्या अमरिंदर सिंग यांच्या भूमिकेवर अकाली दलाचे महासचिव आणि राज्यसभा खासदार सुखदेवसिंह ढिंढसा यांनी टीका केली. ते म्हणाले, अशा प्रकारच्या निराशाजनक वक्तव्यावरून अमरिंदर सिंग यांची मानसिकता स्पष्ट होते. अमरिंदर सिंग उलटसुलट वक्तव्ये करत आहेत. आता त्यांनी नवज्योत सिद्धू यांना आमंत्रण दिले. तत्पूर्वी जगमित बराड यांच्याप्रमाणे त्यांना राजकीय शिस्त नसल्याचे म्हटले. यावरून काँग्रेसमधील विश्वास हरवत चालला आहे, असे दिसते. आता ते काँग्रेसची संस्कृती समजणाऱ्यांना आमंत्रित करत आहेत. त्याआधी काँग्रेसची संस्कृती त्यांनीच समजून घ्यावी, काँग्रेसला आपला पराभव स्पष्टपणे दिसू लागला आहे, हे अमरिंदरच्या भूमिकेवरून दिसते, असा टोला खा. ढिंढसा यांनी लगावला.
‘तोतासिंग, कॅरो आणि मजिठियांना तुरुंगात पाठवू’

तलवंडी साबो | आपचे येथील उमेदवार प्रा. बलजिंद्र कौर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद््घाटन आपचे संपर्कप्रमुख आणि दिल्लीचे आमदार जर्नेलसिंग यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल या पंजाब राज्याची लूट चालवली असल्याचा आरोप त्यांनी केला. बादल यांनी घराणेशाही चालवली आहे. मुलाला उपमुख्यमंत्री,सुनेला केंद्रीय मंत्री, तर जावयाला राज्याचा कॅबिनेट मंत्री केले असे ते म्हणाले. पंजाबमध्ये आपचेच सरकार स्थापन होईल,असा दावा करून ते म्हणाले, सत्तेवर येताच आम्ही सिकंदरसिंग मलुका, तोतासिंग आणि अादेश प्रतापसिंग कैरो आणि मजिठिया यांची चौकशी करण्यात येईल. त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, असेही जर्नेलसिंग यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...