आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब काँग्रेस एक्स्प्रेस: काँग्रेस पक्षाला सिद्धू वा कुण्या बाहेरच्याची गरज नाही - कॅप्टन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - पंजाब काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नवज्योत सिद्धू अथवा बाहेरच्या अन्य कोण्या नेत्याची पक्षाला गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. काँग्रेस बळकट आहे, अडचणीच्या काळात पक्ष सोडून गेलेल्यांना स्थान दिले जाणार नाही. सिद्धू आणि छोटेपूर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या मुद्द्यावर कॅप्टन म्हणाले, त्यांच्याशी संपर्क करण्यात आलेला नाही. तसेच चौथ्या फ्रंटच्या या नेत्यांनीही आमच्याशी संपर्क केला नाही. पक्षाचे बंडखोर नेते बीर दविंदर सिंह पुन्हा पक्षात येण्याच्या प्रश्नावर त्यांनी याबाबत अद्याप काही ठरले नसल्याचे सांगितले.
तिसरी प्रचार मोहीम : “कॉफी विथ कॅप्टन’ आणि “इलके विच कॅप्टन’नंतर पंजाब काँग्रेस आली आहे. प्रचार मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात काँग्रेस लाओ, पंजाब बचाओ, असा नारा देण्यात आला. शनिवारी पंजाब प्रभारी आशा कुमारी आणि निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्ष अंबिका सोनीसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कॅप्टन यांनी पंजाब काँग्रेस एक्स्प्रेस मोहिमेचा शुभारंभ केला. याअंतर्गत १३ बसना झेंडी दाखवण्यात आली. या वेळी कॅप्टन म्हणाले, सर्व ११७ मंडळांमध्ये आगामी ३७ दिवसांत पक्षाचे आमदार, ज्येष्ठ नेते काँग्रेस लाओ, पंजाब बचाओ मोहीम चालवतील. यामुळे पक्ष थेट २५ लाख नागरिकांशी जोडला जाईल आणि १.५ कोटी लोकांपर्यंत पक्षाचा अजेंडा समोर आणता येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजिंदर कौर भट्टल, चरणजित चन्नी, सुनील जाखड, आदी नेते २६ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत सलग ३७ दिवस नुक्कड सभा घेणार आहेत. बसला लावलेल्या स्पीकरवर “चाहुदां है पंजाब, कॅप्टन दी सरकार।’ हे गीत वाजवले जाईल.
छोटेपूर यांच्या व्हिडिओ क्लिपिंगचे रहस्य वाढले
चंदिगड - दोन लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली आम आदमी पार्टीच्या पंजाब संयोजक पदावरून हटवण्यात आलेले सुच्चासिंह छोटेपूर यांचे स्टिंग करून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिपिंगचे रहस्य कायम आहे. पक्षाने व्हिडिओ अद्याप सार्वजनिक केला नाही. तसेच याबाबत चौकशी समिती काहीही बोलण्यास तयार नाही. चौकशी समितीचे सदस्य दबक्या आवाजात क्लिपिंग पाहिली नसल्याचे सांगत आहेत. समितीने वस्तुस्थितीच्या आधारावर अहवाल तयार केला. स्टिंग कोणी केले आणि ती कोणाकडे सोपवली हेही स्पष्ट नाही.
स्टिंग केवळ बहाणा - छोटेपूर : दोषी ठरवण्याच्या मुद्द्यावर छोटेपूर म्हणाले, स्टिंग केवळ बहाणा होता. मला हटवणे हाच उद्देश होता. चूकच नसेल तर चौकशी कोणत्या गोष्टीची. दिल्लीच्या नेत्यांचा हा कट अाहे.
बातम्या आणखी आहेत...