आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्‍या नशेत सैनिकाने केला छतावरून गोळीबार, तीन ठार, नंतर केली आत्‍महत्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - पंजाबच्‍या संगरूर जिल्‍ह्यातील हसनपुर या गावातील ही घटना आहे. एक सैनिकाने मंगळवारी त्‍याच्‍या घराच्‍या छतावरून गोळीबार केला. त्‍यामध्‍ये तीन जण ठार झाले आहेत, तर चौघे जखमी झाले आहेत. सैनिकाने दारूच्‍या नशेत त्‍याच्‍या घराच्‍या छताहून तब्बल तासभर गोळीबार केला आहे. या सैनिकाने नंतर स्‍वत:वरही गोळी झाडली.
काय म्‍हणाले पोलिस?
संगरूरचे एसपी जसकिरन सिंह यांनी सांगितले की, या जवानाचे नाव जगदीप होते. तो दोन महिन्‍यांच्‍या सुटीवर होता. कौटुंबीक भांडणानंतर हा गोळीबार झाल्‍याची माहिती गावक-यांनी दिली आहे. गोळीबारात जखमी झालेल्‍यांना गावक-यांनीच हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केले आहे. त्‍यांची प्रकृती गंभीर असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. त्‍यांना पटियाला हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.
सैनिकाला पोलिसांनी घेरले नि त्‍याने गोळी झाडली
12 बोरची बंदुक घेऊन हा सैनिक छतावर गेला होता. त्‍याने अचानक हवेत गोळीबाराला सुरूवात केली. काही वेळानंतर पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेण्‍याचा प्रयत्‍नही केला. पण पोलिस जवळ येताच या सैनिकाने स्‍वत:वर गोळी झाडून घेतली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो व व्‍हिडीओ..