नराधमांनी आधी पीडितेचे अपहरण केले. नंतर तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर 11 जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. आरोपींनीमध्ये पीडितेच्या मैत्रिणीच्या पतीचा समावेश आहे. पीडितेच्या तक्रारीवरून मोगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेल'
धावत्या बसमध्ये छेडछाड करून दोन्ही मायलेकींना बाहर ढकलून देण्यात आले होते. यात मुलीचा मृत्यू झाला. आई गंभीर जखमी झाली आहे. नातीला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेल, असा इशारा वजा धमकी मृत मुलीची आजी सुरजीत कौरने प्रशासनाला दिली आहे. माझ्या आत्महत्येला पंजाबमधील बादल सरकार जबाबदार राहिल, असेही सुरजीत कौर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मोगामध्ये बुधवारी (28 एप्रिल ) धावत्या बसमध्येच कंडक्टर, हेल्पर 13 वर्षीय मुलीशी छेडछाड करत होते. आईने विरोध केला तेव्हा तिच्याशीही गैरवर्तन केले. मग दोघींनाही धावत्या बसमधून खाली ढकलून दिले. मुलीचा मृत्यू झाला. आई गंभीर जखमी झाली. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या बसमध्ये हा सर्व प्रकार घडला.
बुधवारी सायंकाळची ही घटना जखमी महिलेने शुद्धीवर आल्यानंतर सर्व प्रकार सांगितल्यानंतर गुरुवारी उजेडात आली. तिकिटावरून भांडण झाल्यावर महिलेने मुलीसह उडी घेतली होती, असे पोलिसांनी आधी म्हटले होते. परंतु, लोकसभेतही प्रकरण गाजले तेव्हा चालक रणजित, कंडक्टर सुखविंदर, हेल्पर गुरदीपसह अमरजित या आरोपींना अटक झाली. चौघांवर खून, खुनाचा प्रयत्न आणि छेडछाडीचे गुन्हे दाखल झाले. काँग्रेस
आपने घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
बस आमची, पण संबंध नाही - मुख्यमंत्र्यांनीही हात झटकले
दुर्दैवाने बस आमचीच आहे. पण माझा तिच्याशी काही संबंध नाही. सर्वाधिक दु:खही मलाच झाले आहे. मोठा गुन्हा आहे. हे चांगले नाही. यापेक्षा अधिक काय करू शकतो, असे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल म्हणाले.
बस कोणाची, चौकशी करू - इति बादलांच्या स्नुषा हरसिमरत
मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री पुत्र सुखबीर बादल यांच्या मालकीच्या आॅरबिट कंपनीची ही बस आहे. सुखबीर यांच्या पत्नी व केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, बस कंपनी कोणाची, त्याची चौकशी करू.