आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगार तरुणांना बादलांच्या बस जप्त करून वाटप करणार : केजरीवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाधापुराना - मुख्यमंत्री बादल यांच्या बस जप्त करून त्यांचे तरुणांमध्ये वाटप केले जाईल. यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल. आपचे सरकार आल्यावर २५ हजार तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे दिले.

केजरीवाल म्हणाले, बादल कुटुंब आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह यांनी स्वत:च्या फायद्यासाठी पंजाबला लुटले. त्यांची मुले त्यांना माफ करणार नाहीत. अकाली आणि काँग्रेसने पंजाबच्या नागरिकांना काय दिले? बादल आणि अमरिंदर यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून ताबा मिळवला. यामुळे १५ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत. मी त्यांना सोडणार नाही. बादल यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील मंत्री तोतासिंह, सिकंदरसिंह मलुका आणि विक्रमसिंह मजिठिया यांना तुरुंगात डांबून त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. त्यातून शाळा, रुग्णालय आणि रस्ते तयार केले जातील, असे केजरीवाल यांनी सांगितले. त्यांनी मजिठिया यांना सांगितले, तुमच्यात धाडस असेल तर मला अटक करा; अन्यथा ४ महिन्यांनंतर मी अटक करेन. सरकार स्थापन झाल्यास आम्ही बड्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज व लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ.

‘पंजाबियत’ शिकवू : पतियाळामध्ये केजरीवाल यांनी ा सांगितले की, शोषण रोखण्यासाठी कंत्राट प्रणाली संपुष्टात आणू. मेडिकोज व शिक्षकांना नियमित करू. आमचा जाहीरनामा अन्य पक्षांच्या जाहीरनाम्याप्रमाणे धूळफेक नाही. शाळांमध्ये पंजाबी संस्कृती,पंजाबीपण बळकट करण्यासाठी महान शहिदांची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊ.
बातम्या आणखी आहेत...