आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सोबत नाचू दिले नाही म्हणून डान्सरवर भरकार्यक्रमात झाडली होती गोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणाची फोक सिंगर आणि डान्सर हर्षिता दाहिया (20) हिचा मंगळवारी तिच्याच कारमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला. घटनेच्या वेळी हर्षितासोबत तिचे काही मित्रही होते. त्यांना हल्लेखोरांनी गाडीतून उतरवले होते. हर्षिताला 4 गोळ्या लागल्या. तिचा जागीच मृत्यू झाला. तथापि, अशीच घटना गतवर्षीही पंजाबच्या भटिंडामध्ये घडली होती.
लग्नसोहळ्यात कुलविंदर या डान्सरने आरोपीसोबत स्टेजवर डान्स करायला नकार दिल्याने भरकार्यक्रमात तिचा गोळी झाडून खून करण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मृत कुलविंदर तेव्हा गर्भवती होती. कार्यक्रमात आल्यापासून आरोपी तिला सोबत डान्स करण्याचा आग्रह करू लागला होता. परंतु कुलविंदरने नकार दिल्याने आरोपीने तिचा खून केला होता.
बातम्या आणखी आहेत...