पाटणा - कॅनडासह पंजाबमध्ये चर्चित असलेली रुबी ढल्ला सध्या बिहारमध्ये आहे. येथे तीन दिवस चालणा-या आंतरराष्ट्रीय शीख परिषदेत सहभागी होण्यासाठी ती आली आहे. रुबी कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या 2004 ते 2011 पर्यंत सदस्य राहिली आहे. तिला मॅक्सिम मासिकाने 2008 मध्ये जगातील सर्वात हॉट महिला राजकारणींच्या यादीत तिसरे स्थान दिले होते. जाणून घ्या कोणत्या चित्रपटात हॉट सीन दिल्याने चर्चेत राहिली होती रुबी...
- राजकारणात येण्यापूर्वी रुबीला चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती. तिने कॅनडात बनलेल्या 'क्यो किस लिए' या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती.
- ढल्लाने या चित्रपटात अभिनेता चरणजित सिहरासोबत काही हॉट सीन्सही दिले होते.
- हा चित्रपट कॅनडात राहणा-या सुखींदर ढिल्लो हत्याकांडावर बनवण्यात आला होता. यात पती आपल्या पत्नीला विम्याच्या पैशांसाठी विष देऊन मारतो.
- हा चित्रपट कॅनडा व भारतात प्रदर्शित करण्यात आला. पण तो फ्लॉप ठरला.
2004 ते 2011 पर्यत होती खासदार
- चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर रुबीने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. ती 2004 ते 2011 पर्यंत कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्य म्हणून निवडून आली.
- रुबी कॅनडातील पंजाबी समुदाय आयोजित करत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असते.
वयाच्या 10 व्या वर्षी आली चर्चेत
- रुबी ढल्लाचा जन्म कॅनडाच्या विनिपेगमध्ये राहणा-या एका पंजाबी कुटुंबात झाला.
- ती पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवर वयाच्या 10 व्या वर्षीपासून म्हणजे 1984 साली चर्चेत आली होती.
- त्यावेळी भारतीय सैनिकांनी सुवर्ण मंदिरावर कारवाई केली होती. रुबीने याबाबत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहिले होते.
काय लिहिले होते पत्रात?
तिने लिहिले होते, आदरणीय पंतप्रधानजी, मी तुम्हाला पत्र लिहित आहे. कारण मी भारताविषयी चिंतित आहे. खास करुन पंजाबमध्ये सर्वाधिक लढाया होत आहे. मला माहित नाही, की ते का वेगळ्या राज्याची मागणी करित आहेत. का लोक स्वत:चे हित व देशाची प्रगतीत त्यांचे योगदान द्यायला विसरतात. मला आशा आहे, लवकरच तुम्ही परिस्थिती सर्वसामान्य कराल.
पुढील स्लाइड्सवर पाहा रुबी ढल्लाचे निवडक छायाचित्रे....