चंदीगड - सेक्टर-17 च्या फुटबॉल मैदानावर (गुरुवारी) 'इट्स इनफ' या गाण्याचे शुटिंग करण्यात आहे. स्ट्रगलिंग फुटबॉलपटू आणि गर्भश्रीमंत प्रेयसी यांच्यामधील प्रेमप्रकरणावर आधारीत हे गाणे आहे.
गाणे पंजाबी आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग करतार फिल्म्स अँड कंपनीच्या बॅनरखाली होत आहे. या गाण्याचे निर्माता रवी कुमार असून दिग्दर्शक क्षितील चौधरी आहेत.
गायक आणि अभिनेत्याच्या भूमिकेत आरवी असून गायिका आणि अभिनेत्रीच्या भूमिकेत सारेगामा लिटल चॅम्स-2007 ची टॉप-10 मधील बार्बी राजपूत असणार आहे. राष्ट्रीय फुटबॉलपटू अंकून खन्नाने दोन महिने आरवीला प्रशिक्षण दिले आहे. आगामी दहा-पंधरा दिवसांमध्ये हे गाणे रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, 'इट्स इनफ' गाण्याच्या चित्रीकरणाची छायाचित्रे...