अमृतसर - अबुधाबीच्या तुरुंगात कैदेत असलेल्या पंजाबच्या युवकांना तेथील प्रशासन इस्लाम धर्म स्वीकार करण्यासाठी दबाव आणत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर, तुरुंगात या तरुणांवर गोमांस खाण्याची सक्तीही केली जात आहे. इस्लाम स्वीकारल्यास लवकरच सोडण्याचे आमीषही या तरुणांना दाखवले जात आहे.
नातेवाईकांनी केली तक्रार
अबुधाबीच्या तुरुंगात कैदेत असलेल्या एका तरुणाच्या नातेवाईकांनी सोमवारी राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष राजकुमार वेरका यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. या प्रकरणी गांभीर्याने आणि त्वरित कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन वेरका यांनी नातेवाईकांना दिले. तसेच या प्रकरणी अबुधाबी येथील दुतावासतून अहवालही मागवण्यात आला आहे.
असा रचला जातोय कट
सुखवंत सिंह बोनी नावाच्या तुरुंगात कैद असलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांचा मुलगा 2009 मध्ये दुबईला गेला होता. पण 2011 मध्ये त्याला खुनाच्या एका प्रकरणात फसवून तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर सुखवंतवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि गोमांस खाण्यासाठी दबाव आणला जात आहे. इस्लाम स्वीकारल्यास शिक्षा कमी केली जाणार अशल्याचेही तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अबुधाबीच्या तुरुंगातून शिक्षा भोगून परतणार्या सदानंद नावाच्या युवकाने या आरोपांना दुजोरा दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आयोग आता अबुधाबीच्या तुरुंगात कैदेत असलेल्या भारतीय युवकांची माहिती घेत आहे.