आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab\'s Victory Over Rajasthan Royals In Super Over

पंजाबचा राॅयल्सवर ‘सुपर’ विजय, विजयी रथ राेखला; सुपर अाेव्हरमध्ये पछाडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - वीरेंद्र सेहवागच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी सुपर राेमांचक विजयाची नाेंद केली. मिशेल मार्श अाणि मिशेल जाॅन्सन यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर पंजाब संघाने सुपर अाेव्हरचा सामना अापल्या नावे केला.
सुपर अाेव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने सहा चेंडूंत १ बाद १५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मिशेल जाॅन्सनने धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानच्या कर्णधार शेन वाॅटसन अाणि जेम्स फाॅकनरला बाद करून पंजाब संघाचा विजय निश्चित केला.

यंदाच्या सत्रात सुपर अाेव्हरमध्ये खेळला गेलेला राजस्थान विरुद्ध पंजाब हा पहिला सामना ठरला. अजिंक्य रहाणे (७४) अाणि शेन वाॅटसनच्या (४५) तुफानी फटकेबाजीच्या बळावर राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा बाद १९१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या किंग्ज इलेव्हन संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात १९१ धावा काढल्या. खडतर अाव्हानाच्या प्रत्युत्तरात पंजाबच्या टीमकडून डेव्हिड मिल्लर अाणि मार्शने तुफानी खेळी केली. या दाेघांनी चाैथ्या गड्यासाठी अर्धशतकाची भागीदारी करून संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. मात्र, तांबेने ही जाेडी फाेडली. त्याने मार्शला बाद केले. मार्शने ४० चेंडूंचा सामना करताना पाच चाैकार अाणि तीन षटकारांसह ६५ धावा काढल्या. तसेच मिलरने ३० चेंडूंत ५४ धावा काढल्या. त्यानंतर अालेल्या अक्षर पटेलने शेवटच्या चेंडूवर चाैकार मारून सामना बराेबरीत ठेवला. त्यामुळे हा सामना सुपर अाेव्हरमध्ये गेला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या राजस्थानला अजिंक्य रहाणे अाणि वाॅटसनने दमदार सुरुवात करून दिली हाेती.

सामनावीर शाॅन मार्श, जाॅन्सनचा दणका
सुपर अाेव्हरमध्ये शाॅन मार्शने शानदार फलंदाजी करून किंग्ज इलेव्हन पंजाबला राजस्थानसमाेर खडतर अाव्हान ठेवण्यासाठी महत्त्वाचे याेगदान दिले. त्याने सुपर अाेव्हरच्या चार चेंडूंत एकूण १४ धावा काढल्या. यात तीन चाैकारांचा समावेश अाहे. यासह पंजाबला राजस्थानसमाेर विजयासाठी सहा चेंडूंत १६ धावांचे लक्ष्य ठेवता अाले. त्यानंतर गाेलंदाजीत मिशेल जाॅन्सने सुपर खेळी केली. त्याने धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानचा कर्णधार वाॅटसनला पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूंवर फाॅकनरला बाद करून पंजाबला विजय मिळवून दिला.

रहाणेचे तिसरे अर्धशतक
राजस्थान राॅयल्स संघाच्या अजिंक्य रहाणेने यंदाच्या सत्रात तिसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने पंजाबविरुद्ध सामन्याच्या १४ व्या षटकात अनुरीतच्या चेंडूवर षटकार मारून तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने सामन्यात ७४ धावांची खेळी केली. यापूर्वी त्याने चेन्नई सुपरकिंग्ज (नाबाद ७६) अाणि हैदराबादविरुद्ध (६२) अर्धशतक ठाेकले.
पुढील स्लाइडवर पाहा, सुपर ओव्हरमधील थरार...