आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांच्या शिक्षकांची छायाचित्रे बाहेर भिंतीवर लावणार, UPमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनौर - उत्तर प्रदेशमधील प्राथमिक शाळांमध्ये लवकरच शिक्षकांची छायाचित्रे भिंतींवर चिटकवली जातील. शाळांमधील काही शिक्षक आपल्या जागेवर दुसऱ्याला शिकायला पाठवतात आणि त्यासाठी त्यांना पैसेही देतात, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 
अधिकाऱ्यांनी सांगितले, “ काही शिक्षक स्वत: शाळेत येण्याऐवजी भाडोत्री लोकांना तेथे शिकवण्यासाठी पाठवतात. त्या काळात जे खरे शिक्षक आहेत, ते अनेक तास शाळेच्या बाहेर राहतात, अशा तक्रारी आम्हाला मिळत होत्या. त्यामुळे आम्हाला असा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने शाळा बंद आहेत. पण १ जुलैपासून शाळांचे सत्र सुरू होईल तेव्हा त्यांच्या खऱ्या शिक्षकांची छायाचित्रे मुलांना भिंतीवर लावलेली दिसतील.”
 
अतिरिक्त संचालक भागवत पटेल म्हणाले की, “हे एक चांगले पाऊल आहे. त्यामुळे पालकांना खरे शिक्षक कोण याची ओळख होईल आणि त्यांच्यावर विश्वास ठेवता येऊ शकेल. त्याद्वारे आम्बी पालक-शिक्षक यांच्यादरम्यान एक संबंधही तयार करू शकू. शिक्षकांच्या छायाचित्रासोबतच त्यावर शिक्षकाचे नाव आणि मोबाइल क्रमांकही असेल.”
 
हजेरीच्या समस्येमुळे उचलले पाऊल :  या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या शिक्षणमंत्री (स्वतंत्र प्रभार) अनुपमा जायसवाल म्हणाल्या, “आम्ही शिक्षकांची छायाचित्रे डिस्प्ले बोर्डवर लावण्याबाबत चर्चा केली आहे. ज्या शाळांत डिस्प्ले बोर्ड नाहीत, तेथे हजेरी रजिस्टरच्या पहिल्या पानावर छायाचित्रे लावली जातील. शिक्षकांच्या हजेरीची समस्या लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात येत आहे.”

शिक्षक ५ हजार रुपयांवर इतरांना घेतात भाड्याने
कनिष्ठ उच्च माध्यमिक शाळा संघटनेचे बिजनौर जिल्ह्याचे सचिव दुष्यंत कुमार म्हणाले की, “ काही शिक्षक आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत हे खरे आहे. ते शाळेत खूपच कमी काळ जातात आणि आपली हजेरी लावण्यासाठी ५ हजार रुपयांवर काही लोकांना भाड्याने घेतात. हे भाडोत्री लोक त्यांच्या जागी शाळेत जातात. आता जे पाऊल उचलले जात आहे, त्यामुळे अशा प्रकारचे शिक्षक उघडकीस येतील आणि शिक्षणाच्या दर्जात सुधारणा होईल.”
 
बातम्या आणखी आहेत...