आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणी राजस्‍थानच्‍या मंत्र्याची होणार डीएनए चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- बलात्‍काराच्‍या आरोपात अडकलेले राजस्‍थानचे मंत्री बाबूलाल नागर यांचा राजीनामा मंजूर करण्‍यात आला आहे. आता मुख्‍यमंत्री त्‍यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. दरम्‍यान, नागर यांच्‍या अडचणी वाढण्‍याची शक्‍यता आहे. पीडित मुलीच्‍या शरीरावर जखमा आढळल्‍या आहेत. तिच्‍या शरीरावर चावण्‍याची जखम आहे. त्‍यामुळे नागर यांची डीएनए चाचणी होण्‍याची शक्‍यता आहे. तसे झाल्‍यास राज्‍यातील ते पहिले मंत्री ठरतील ज्‍यांची डीएनए चाचणी झाली.

नागर यांच्‍यावरील आरोपांची तपासणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक व्‍ही. के. गौड यांना सोपविण्‍यात आली आहे. त्‍यावरुन प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित करण्‍यात येत आहे. गौड हे नागर यांच्‍या जवळचे अधिकारी असल्‍याचे मानले जातात. नागर यांच्‍याच शिफारसीवरुन त्‍यांना दूदू येथे 2001 मध्‍ये दूदू येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर बढती देण्‍यात आली होती. त्‍यावेळी नागर हे दूदू मतदारसंघात आमदार होते.