आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radha Krishna Become Temple The Nation's Highest Rajasthan, Divya Marathi

जयपूरमध्ये होणार राधा-कृष्णाचे देशातील सर्वांत उंच मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरमध्ये लवकरच देशातील सर्वांत उंच कळसाचे राधा-कृष्ण-बलरामाचे मंदिर जगतपुराच्या अक्षय पात्र फाउंडेशमध्ये होणार आहे. याची उंची 200 फूट असेल. यामध्ये राजस्थानी आणि आधुनिक शिल्पकलांचा अनोखा संगम पाहावयास मिळेल. मंदिर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचे केंद्रही असेल.
बाहेर माधव उद्यानात सर्वत्र हिरवाई दिसून येईल. मंदिराचे बांधकाम पाच लाख चौरस फूट क्षेत्रात होईल. येथील संपूर्ण परिसराचा विस्तार 6 एकर क्षेत्रात झालेला असेल.
108 कलात्मक मोरांनी सुसज्ज 20 फूट उंच प्रवेशद्वारात 200 फूट उंचीच्या मंदिरात राधा-कृष्ण-बलराम आणि गौर-नीताईची मूर्ती असेल. याच्या जवळ 170 फूट उंचीच्या मंदिरात सीता-राम-लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्ती असतील.
100 फुटांपेक्षा जास्त रुंदीची जगातील सर्वात मोठी मेघडंबरी वैशिष्ट्यपूर्ण असेल. एवढेच नव्हे तर मंदिरामध्ये 7000 चौरस फुटांचे एक सरोवर गोविंद कुंड असेल.
1500 चौरसमीटरमध्ये मंदिराचे मैदान असेल. अक्षयपात्र परिसरात मंदिराव्यतिरिक्त ऑडिटोरियममध्ये अन्य बांधकामे चार टप्प्यात होतील. पहिल्या टप्प्यात होणार्‍या मंदिराचे बांधकाम 2016 च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. तीन टप्प्यातील काम पाच वर्षात पूर्ण होईल.
5 लाख चौरस फूट परिसरात स्थापले जाईल मंदिर, आगामी वर्षात काम पूर्ण होईल.
200 फूट उंच असेल राधा-कृष्ण-बलराम आणि सीतारामचे मंदिर
गरुड स्तंभ आणि मेघडंबरीचे विशेष आकर्षण
अक्षय पात्र फाउंडेशनचे अध्यक्ष आर. गोविंद म्हणाले, हरे कृष्णा मूव्हमेंटच्या सहकार्याने होत असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गरुड स्तंभ राहील.
अन्य वैशिष्ट्ये : मंदिर परिसरामध्ये 800 पाहुण्यांच्या क्षमतेचे तीन हॉल, 500 आसनांचे एक ऑडिटोरियम, मल्टिमीडिया थिएटर, अन्नदान हॉल, कृष्णा हेरिटेज स्टडी सेंटर, वैदिक बुक काउंटर आणि श्रीमद्भगवत गीता एक्स्पो असेल. याव्यतिरिक्त गोशाला, भक्ती वेदांत पुस्तकालय, हरिनाम मंडप, गेस्टरूम, फूड कोर्ट आणि विवाह समारंभासाठी जागा उपलब्ध असेल. अन्य एका भवनामध्ये ब्रम्‍हचारी आर्शम, लेक्चर हॉल आणि अक्षयपात्रचे स्वयंपाकगृह असेल. या मंदिरामध्ये 600 दुचाकी, 450 कारसाठी वाहनतळ असेल.