आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाची खळगी भरण्यासाठी शिवणकाम करत होती राधे माँ, खरे नाव सुखविंदर कौर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - मुळच्या पंजाबमधील राधे माँ विरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. स्वतःला देवीचा अवतार सांगणारी राधे माँ अनेकदा वादात अडकलेली आहे. divyamarathi.com आपल्या वाचकांना या पॅकेजमधून राधे माँ चे लग्नानंतरचे आयुष्य आणि एका साधारण महिलेची 'राधे माँ' कशी झाली याची माहिती देत आहे. राधे माँ चे खरे नाव सुखविंदर कौर आहे. लग्नानंतर तिने शिवणकाम केले होते.

पंजाबच्या गुरुदासपूरमधील रंगाला हे सुखविंदर कौरचे (राधे माँ) मुळ गाव. तिचे लग्न मुकेरियाच्या मानमोहनसिंग याच्यासोबत झाले. लग्नानंतर सुखविंदर कौरचा नवरा नोकरीच्या निमीत्ताने कतारची राजधानी दोहा येथे गेला. त्यामुळे आर्थिक स्थिती खालवली. दोनवेळच्या भोजनाची सोय करण्यासाठी सुखविंदरला शिवणकाम करावे लागत होते. त्याच काळात अर्थात वयाच्या 21 व्या वर्षी ती महंत रामाधीन परमहंस यांची सेवा करु लागली. परमहंस यांनी सुखविंदरला सहा महिन्यांची दीक्षा दिली आणि तिचे नामकरण केले 'राधे माँ'.
पुढील स्लाइडमध्ये, पंजाबातील घर आणि राधे माँ बद्दल
बातम्या आणखी आहेत...