आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँने देवीच्या फोटोवर लावला होता स्वतःचा चेहरा, सोडावे लागले पंजाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राधे माँवर नुकताच कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राधे माँ उर्फ बब्बू पुन्हा चर्चेत आली आहे. मुंबईत अटक होण्याच्या भीतीने राधे माँ आणि तिच्या सेवकर्‍यांनी मुंबईतील बोरिवली येथून पोबारा केला आहे. याआधी राधे माँने अशाच कारणांमुळे पंजाब सोडले होते.
धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपानंतर सोडले होते शहर
पंजाबातील मुकेरिया येथे 14 वर्षांपूर्वी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप राधे माँवर ठेवण्यात आला होता. 2001 मध्ये मुकेरिया येथे राधे माँ ने अष्टभुजी माताच्या फोटोवर स्वतःचा चेहरा लावला आणि देवी भगवतीच्या रुपात स्वतःला सादर केले होते. हे फोटो मुकेरियामध्ये वाटले गेल्यानंतर राधे माँ विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. फगवाडा येथे 2002 मध्ये राधे माँने सार्वजिनक रित्या माफी मागितली आणि शहर सोडले होते.

काय आहे मुंबईतील प्रकरण ?
बोरिवलीच्या निकी गुप्ता यांनी आठवड्याभरापूर्वीच कांदिवली पोलिस ठाण्यात राधे माँसह गुप्ता कुटंुबातील सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मिठाईचे व्यापारी गुप्ता कुटंुबीय हे राधे माँचे भक्त आहेत. राधे माँच्या आश्रमात सेवेकरी म्हणून राहण्याची कुटुंबीयांनी सक्ती केल्याचे निकी यांनी तक्रारीत म्हटले आहे. सेवेदरम्यान राधे माँने आपल्याला लाथाबुक्क्यांनी तसेच हातातल्या त्रिशुळाने मारहाण केल्याचेही निकी गुप्ता यांचे म्हणणे आहे. तक्रारीचे स्वरूप अतिशय गंभीर असून त्याअंतर्गत राधे माँ हिला अटकही होऊ शकते, अशी माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली आहे. अटकेच्या भीतीनेच राधे माँ हिने मुंबईबाहेर पळ काढला आहे. त्यांच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावरील रखवालदाराने सध्या इमारतीत कोणीही नसून सर्व जण दिल्लीला गेल्याची माहिती दिली आहे.
राधे माँ संबंधीत वाद
- दोन वर्षांपूर्वी राधे माँला महामंडलेश्वर उपाधी देण्यात आली होती, तेव्हा देखील राधे माँवर आरोप झाले होते. संत समुदायातील एका गटाने तिला महामंडलेश्वर उपाधी देण्याला विरोध केला होता. त्यानंतर ती उपाधी काढून घेण्यात आली होती.
- 5 जून 2002 रोजी दोरांगल येथील पोलिस स्टेशनमध्ये राधे माँचा भाऊ सुखबीरसिंग उर्फ बिल्ला आणि वडील अजितसिंग यांच्याविरोधात हुंडाबळीचा खटला दाखल झाला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, माफी मागताना राधे माँ आणि इतर फोटो
बातम्या आणखी आहेत...