आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मै राधे माँ बोल रही हूँ... विरोधकाला रात्री तीन वाजता केला फोन, विचारली डिमांड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे माँ आणि रात्री तीन वाजता ज्यांना फोन केला ते सुरेंदर मित्तल - Divya Marathi
राधे माँ आणि रात्री तीन वाजता ज्यांना फोन केला ते सुरेंदर मित्तल
लुधियाना (पंजाब) - स्वतःला देवीचा अवतार सांगणारी वादग्रस्त राधे माँबद्दल मोठा खुलासा झाला आहे. मध्यरात्री फोन करुन लालूच दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्यात राधे माँ तरबेज असल्याचे एका फोन रेकॉर्डिंगमधून उघड झाले आहे. विश्व हिंदू परिषदेचे फगवाडाचे (पंजाब) माजी प्रमुख सुरेंदर मित्तल यांनी काही फोन रेकॉर्डिंग जारी केले आहेत त्यातून राधे माँ मित्तल यांना तूझी काय डिमांड आहे याची विचारणा करते. मित्तल 13 वर्षांपासून राधे माँचे विरोधक आहेत.
राधे माँ आणि सुरेंदर मित्तल यांचे कनेक्शन 13 वर्षांपासूनचे आहे. राधे माँचा 13 वर्षांपूर्वी पंजाबातील फगवाडामध्ये कार्यक्रम झाला होता. तेव्हा अष्टभूजा देवीच्या फोटोवर स्वतःचा चेहरा लावून ते पोस्टर फगवाडामध्ये वितरीत करण्यात आले होते. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी राधे माँ विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व सुरेंदर मित्तल यांनी केले होते. त्यानंतर राधे माँला फगवाडातील जनतेची जाहीर माफी मागून तेथून पळ काढावा लागला होता.
राधे माँने सुरेंदर मित्तल यांना रात्रीच्या तीन वाजता फोन करुन त्यांच्यासोबत संवाद साधला होता. त्याचे रेकॉर्डिंग त्यांनी सार्वजनिक केले आहे. या फोन संवादात राधे माँची भाषा ही एखाद्या धार्मिक स्त्रीची आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, अशी आहे. मित्तल यांनी एवढ्या रात्री फोन करण्याचे काय कारण, असे विचारल्यावर राधे माँचे उत्तर होते, की मला तुमच्या फोनची रिंगटोन फार आवडते. मी तर नाइट बर्ड आहे.

सुरेंदर मित्तल यांच्यासोबतचा राधे माँच्या संवादाचे काही अंश...

सुरेंदर मित्तल - कोण बोलतय..
राधे माँ - मी राधे माँ. देवी माँ, मुंबईहून बोलतेय. हा माझा पंजाबमधील नंबर आहे.
सुरेंदर मित्तल - तू राधे माँ असू शकत नाही, समजेल काय !
राधे माँ - हो ?
सुरेंदर मित्तल - तू राधे माँ असूच शकत नाही .
राधे माँ - का ?
सुरेंदर मित्तल - काय, का ? सकाळी सांगेल. एवढ्या रात्री मला फोन का केला ?
राधे माँ - मी हे सांगण्यासाठी फोन केला की...
सुरेंदर मित्तल - मला काही सांगण्याची गरज नाही काय ?
राधे माँ - तुमची काही डिमांड आहे काय...
सुरेंदर मित्तल - माझी ? माझी कोणत्या गोष्टीची डिमांड असणार ? माझी काही डिमांड नाही.
राधे माँ - तुम्हाला काही पाहिजे असेल तर मी हेल्प करु शकते.
सुरेंदर मित्तल - मला काही नाही पाहिजे... आणि मी तुझ्या सारखीकडून का काही घेऊ...
राधे माँ - काही माणूसकीच नाही ?
सुरेंदर मित्तल- मला माणूसकीची गरज नाही. तूझ्या सारखीकडून काय माणूसकी शिकायची.. चोरांकडून .. ?
राधे माँ - काय, माझे काहीच नाही का ?
सुरेंदर मित्तल - होय... बरोबर आहे.. तुझे काहीच नाही .
राधे माँ - हो.. मी सर्वात मोठी चोर आहे ना..
सुरेंदर मित्तल - बरोबर.. एकदम
राधे माँ - काही हरकत नाही... मी चोर आहे ना.. भीकारी आहे... बेग आहे.. मी गरीब आहे ना...
सुरेंदर मित्तल - काही हरकत नाही..

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी एक वादग्रस्त संवाद