पणजी - नवी दिल्ली-पॅरिस-भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा सौदा केला आहे. देश १७ वर्षांनंतर लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. दोन वर्षांत पहिले विमान हवाई दलात दाखल होईल. अतिशय चांगल्या अटींवर केलेला चांगला निर्णय असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. यामुळे हवाई दलास किमान आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळेल, असा पर्रीकरांचा दावा आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्रान्सकडून ३६ तयार राफेल विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
का गरजेचा होता सौदा ?
१९९७ मध्ये भारताला रशियाकडून सुखोई लढाऊ विमाने मिळाली होती. त्यानंतर कोणतेही नवीन विमान खरेदी करण्यात आले नव्हते. लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनची संख्या ४३ हून ३४ वर आली. आगामी आठ वर्षांत महत्त्वाची आठ विमाने जुनी झाल्यामुळे त्यांना ताफ्यातून बाहेर काढणे महत्त्वाचे होते. आता या खरेदीमुळे भारताची हल्ल्याची क्षमता वाढेल.