आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

24 तासांत एकदाच या स्थानकावर येतात प्रवासी, बाकावर तिकिटाची विक्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लॅटफाॅर्मवर  तिकीट घेण्यास सायकलवरून आलेली व्यक्ती - Divya Marathi
प्लॅटफाॅर्मवर तिकीट घेण्यास सायकलवरून आलेली व्यक्ती

गुणा-  मध्य प्रदेशातील गुणा जिल्ह्यातील राघोगड रेल्वे स्थानकावर २४ तासात फकत एकदाच प्रवाशांची वर्दळ दिसते. रेल्वे येण्याआधी अर्धा तासापूर्वी येथे एकमेव अशा टपरीवर चहा-भजे मिळतात. सुमारे २० मिनिटे आधी एक व्यक्ती तेथे येते. तेथील दगडाच्या बाकावर तिकीटाची विक्री सुरू होते. २५ वर्षापूर्वी दैनंदिन वापरातून बाद झालेले  खाकीचे तिकीट येथे आजही चालतात.


या रेल्वेस्थानकावर रेल्वे सुटण्याची किंवा थांबण्याचा इशारा देणारे सिग्नल नाही. धावत्या रेल्वेच्या चालकास काही प्रवाशी येताना दिसले तर तो स्वत:च ब्रेक लावून गाडी थांबवतो किंवा प्रवाशी हात दाखवून रेल्वे थांबवतात. गेल्या १५ वर्षापासून हे असेच सुरू आहे. येथे पूर्वी फक्त १० ते १२ तिकिटांची विक्री होत असे. आता ती कधी -कधी २०० तिकिटांची विक्री होते.
२००२ पासून येथे बीना-नागवा रेल्वे थांबा झाला आहे. तेव्हापासून येथे एम. के. शर्मा नावाचे गृ़हस्थ येथे रेल्वे तिकिटांची विक्री करतात. गुना येथील शर्मा गॅस अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये अस्थायी नोकरी करतात. सकाळी कामावर जाण्याआधी स्थानकावर तिकीट विक्री करतात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, याच गावचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह रहिवाशी आहेत.

बातम्या आणखी आहेत...