आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दत्तक पुत्रा’ची उत्तर प्रदेशला गरज काय? रायबरेलीत प्रियंकांचा पंतप्रधान मोदींना टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेल्या प्रियंका गांधी- वड्रा यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. स्वत:चेच भरपूर पुत्र असताना उत्तर प्रदेशला बाहेरच्या ‘दत्तक पुत्रा’ची काय गरज आहे, असा सवाल करत मोदींच्या विधानावर टीका केली.

वाराणसीने मला दत्तक घेतले आहे आणि मी वाराणसीच्या दत्तक पुत्राप्रमाणेच आहे. मी वाराणसीचा विकास करेन, असे यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. मला वाटते उत्तर प्रदेशला खरेच बाहेरच्या कोणाला तरी दत्तक घेण्याची गरज आहे का? मोदीजी, राज्याला बाहेरच्या कोणाला दत्तक घेण्याची काय गरज? येथे कोणी तरुण नाहीत का? उत्तर प्रदेशात अंत:करण आणि मनात उत्तर प्रदेश असलेले राहुल आणि अखिलेशसारखे दोन तरुण आहेत, असे प्रियंका म्हणाल्या. 
 
आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातील प्रियंकांच्या पहिल्याच सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते. उत्तर प्रदेशला बाहेरच्या नेत्याची काहीच गरज नाही. राज्यातील प्रत्येक युवक नेता बनू शकतो. येथील प्रत्येक युवक उत्तर प्रदेशासाठी काम करू शकतो आणि उत्तर प्रदेशचा विकास घडवून आणू शकतो. हीच राहुल आणि अखिलेश यांची इच्छा आहे, असे प्रियंका म्हणाल्या. प्रचारसभेत बोलताना मोदींनी मी उत्तर प्रदेशचा दत्तक पुत्र आहे, सत्ता दिल्यास राज्याचा विकास करीन, असे विधान केले होते.
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, राहुल गांधींनी चढवला मोदींवर हल्लाबोल
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...